1. बातम्या

स्वता:च्या शेतमालाच्या विक्रीसाठी इंजिनीअरनं केली मार्केटिंग; फळ पिकांमध्ये कमावले 17 लाख रुपये

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

शेतकरी आपल्या शेतात काबाड कष्ट करून पिकांचे उत्पन्न घेत असतो. परंतु बाजारात व्यापारी मात्र शेतकऱ्याने गाळलेल्या घामाला मोल योग्य मोल देत नसल्याच आपल्याला नेहमी जाणवतं. यामुळे आता पिकवणारेच विकणारे झाले पाहिजेत तेव्हाच शेतमालाला योग्य दर मिळू शकेल. यावर सोलापूरमधील एका तरुण शेतकऱ्याने काम करत तब्बल 17 लाख रुपयांची कमाई केली आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे, महेश किसन नाईकनवरे.

शेतात पिकविलेले सोन्यासारखे पीक (Crop) मातीमोल भावाने व्यापारी घेत असल्याचं महेशला जाणवलं. यामुळे आयटी (IT Industry) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महेशने नोकरी सांभाळत शेतमालाचे पुण्यात (Pune) मार्केटिंग (Marketing) केले. याच्या जोरावर त्याने दोन एकरातील पपईपासून 9 लाख तर दोन एकरातील केळीतून 8 लाख रुपयांची कमाई केली. महेश हे शेटफळ (ता. करमाळा) येथील रहिवाशी आहेत. तो पुण्यात एका नामांकित अमेरिकन स्वॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला आहेत. या बाबतचे वृत्त सकाळ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा : जळगावच्या पाटील बंधूंचा डाळिंबाच्या शेतीमधून ५० लाखांचा टर्नओव्हर

लॉकडाउनच्या (Lockdown) काळात गावाकडे आल्यानंतर वर्क फ्रॉम होम करत महेशने घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. घरच्या दोन एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करून भरघोस उत्पादन घेण्यात तो यशस्वी झाला. परंतु लॉकडाउनमुळे चांगला दर मिळत नाही, त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही, हे लक्षात येताच पुण्यात रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्वतः कलिंगड विकले. कलिंगडानंतर या शेतात पपईचे पीक घेतले. त्याचवेळी दुसऱ्या दोन एकर क्षेत्रावर केळी पिकाच्या बाबतीत दराची अशीच अवस्था होती. व्यापारी निर्यातक्षम (Export Quality) केळीची खरेदी 3 रुपये किलो करत होते. हे पाहून महेशने आपल्या शेतातील पिकांचे मार्केटिंग करण्याचे ठरवले.

 

आपण आपल्या शेतातील माल शहरात विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांपर्यंत थेट पोचवला तर काय होईल, याचा सर्व्हे महेशने केला. यानंतर त्याच्या लक्षात आले, की आणखी 30 ते 40 टक्के उत्पन्न जादा मिळू शकते. पपई थेट देणे शक्‍य होते; परंतु केळी पिकवण्याची अडचण होती. तेव्हा त्याने आपण पुणे येथे राहात असलेल्या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन केळी पिकवण्यासाठी चेंबर तयार केले. यानंतर एका मजुराच्या मदतीने पुण्यातील काही सोसायट्यांच्या आवारात भरत असलेल्या शेतकरी बाजारामध्ये या मालाची विक्री केली. सध्या हडपसर, मांजरी परिसरातील 40 ते50 किरकोळ विक्रेत्यांना तो आपल्या शेतातील केळी व पपई विकतो.

हेही वाचा : खर्च, जोखीम कमी करणारे नागरे यांचे तीन मजली शेती तंत्र; जाणून नवीन शेतीची पद्धत

आपल्या शेतात तयार झालेल्या मालाची मूल्य साखळी तयार करण्यात तो यशस्वी झाला असून, दोन एकर केळीपासून आजपर्यंत आठ लाख तर पपईचे नऊ लाख रुपये उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. एका नामवंत आयटी कंपनीत काम करणाऱ्या या शेतकरीपुत्राने आपल्या वडील व भावाने आपल्या शेतात पिकवत असलेल्या शेतमालाचे मार्केटिंग करण्यात व चांगले उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. त्याचा हा प्रयोग परिसरातील सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे.

 

शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकविलेल्या कोणत्याच मालाला अपेक्षित दर मिळत नाही. मध्यस्थ व्यापाऱ्यांकडूनही अनेकवेळा शेतकऱ्यांची लूट होते. अशावेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या मालाचे मार्केटिंग स्वत:च करायला हवे. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात आली तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकतात.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters