एका बाजूला द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून किराणा दुकानात वाइनला परवानगी देण्यात आली आहे.तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात द्राक्ष महोत्सव भरवत शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे. अनुष्का, ज्योती, रेडग्लोब, सुपर सोनाका, माणिकचमण ही नाव हे द्राक्षांची.
अशा एक ना अनेक प्रकारची द्राक्ष आता कोल्हापुरकरांना चाखायला मिळणार आहेत. कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते थेट ग्राहक विक्री या योजनेअंतर्गत कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२२ आयोजन केले आहे.दसरा चौकातील शाह स्मारक भवन इथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते आज या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.२८ फेब्रुवारी पर्यंत शाहू स्मारक भवन येथील महोत्सवाला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नमूद करण्यात आलेल्या विविध जातीतील द्राक्षे या महोत्सवात खरेदी सुद्धा करता येणार आहेत.कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे गेल्या दोन वर्षापासून आयोजन केले जात असून या द्राक्ष महोत्सवाला गेल्यावर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदाही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्यांना राज्यस्तरीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता या द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आले.
शिवाय पुढील महिन्यात आंबा महोत्सव आयोजित केला जाणार असल्याचे अयोजकांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांना थेट बांधावरून ग्राहकापर्यंत ही द्राक्षे या निमित्ताने पोहचवता येणार असल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तर पहिल्या कृष्णा दिवशीच ग्राहकांनी मोठा प्रतिसाद नोंदवत द्राक्ष ही खरेदी केली आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा या उद्देशाने सुरू केलेला द्राक्ष महोत्सव यंदाही कोल्हापूरकरांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Share your comments