
emoji
सध्या प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आले आहेत. यामुळे जग अगदी जवळ आले आहे. याचे अनेक फायदे आहेत तर काही तोटे देखील आहेत. तसेच यामध्ये व्हॉटसअँप देखील वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. व्हॉटसअँपवर हृदयाच्या आकाराचा एक लाल रंगाचा इमोजी तुम्ही अनेकदा तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरला असेल. मात्र, आता हाच इमोजी वापरल्यास तुम्हांला तुरुंगवास होऊ शकतो हे तुम्हांला माहिती नसेल. होय, हे खरं आहे सौदी अरबमध्ये या विषयक कठोर कायदा आहे. हे अनेकांना माहिती देखील नाही. त्यामुळे सौदीत लाल रंगातला हृदयाच्या आकाराचा इमोजी तुम्ही चुकूनही कुणाला पाठवलात तर तुम्हाला 60 लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासाचीही शिक्षा भोगावी लागू शकते.
याबाबत माहिती अशी की, सौदीच्या कायद्यानुसार, हृदयाच्या आकाराचा लाल रंगाचा इमोजी प्राप्तकर्त्यानं तक्रार केली आणि एखाद्याचा अपराध सिद्ध झाला, तर हा इमोजी पाठवणाऱ्याला 3 लाख सौदी रियालपेक्षा अधिक दंड किंवा 5 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितरित्या सुनावल्या जाऊ शकतात. यामुळे वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. सौदी अरेबियात कायदे अतिशय कडक आहेत. इथं एखाद्याला रेड हार्ट ईमोजी पाठवणं हा लैगिंक छळाचा गुन्हा मानला जातो. यामुळे या देशात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
हा इमोजी चुकूनही दुसऱ्याला पाठवला आणि त्या व्यक्तीने तक्रार केली तर हा छळ गुन्ह्याच्या कक्षेत येतो. येथे लाल रंगाच्या हृदयाच्या आकाराच्या इमोजीचा संबंध थेट लैंगिक गुन्ह्यांशी जोडण्यात येतो. त्यामुळे दररोजच्या जीवनातील भाग असलेल्या लहानशा चुकाही इथ तुम्हाला भारी पडू शकतात. एका चुकीची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. यामुळे हाच नियम सगळीकडे आला तर सगळ्यांचीच पंचाईत होणार आहे.
व्हॉट्सअँपवर आपण भावनांना शब्दात मांडण्याऐवजी आपण एमोजीचा वापर करतो. व्हॉट्सअँपसह अनेक सोशल मीडियाच्या सगळ्याच ठिकाणी इमोजीचा वापर केला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी रेड हार्ट इमोजीचा वापर केला असेल. मात्र आता इथून पुढे याचा वापर करताना विचार करावा लागणार आहे. तेथील नागरिक आता सावधानता बाळगत आहेत. सुरुवातीला त्या देशात देखील अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Share your comments