साकळाई उपसा जल सिंचन योजना ही श्रीगोंदा आणि नगर तालुक्यासाठी वरदान ठरणारी योजना आहे. ही योजना व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा दिला जात. मात्र, आज पर्यंत या लढ्याला यश मिळाले नाही. आता हा लढा पुन्हा एकदा नव्या दमाने आणि नव्या ताकतीने लढवला जाणार आहे. साकळाई उपसा जल सिंचन योजना व्हावी यासाठी शिवसेना नेत्या व सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी पुढाकार घेतला आहे.
शिवसेना नेत्या व सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी श्रीगोंदा व नगर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. सरकारने ठोस निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता श्रीगोंदा व नगर तालुक्याला साकळाई योजनेतून पाणी मिळवून देणारच, अशी ग्वाही सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी दिली आहे. त्या कोळगाव येथील शिवसेना शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनातं बोलत होत्या.
श्रीगोंदा आणि नगर तालुक्यासाठी वरदान ठरणारी योजना
साकळाई उपसा जल सिंचन योजना ही श्रीगोंदा आणि नगर तालुक्यासाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक गावांना पाणी मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा पर्जन्य छायेत येणार जिल्हा आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे बारमाही पिके घेता येत नाहीत. पाऊस कमी पडतो यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतो.
योजनेचे राजकारण झाले
तालुक्यातील बड्या पुढाऱ्यांनी राजकारण केले. "साकळाई उपसा जल सिंचन योजना" मी करतो मला मतदान द्या, असे म्हणून निवडणूक लढवल्या गेल्या. असे म्हणणारे निवडून आले. गोड बोलून आपली पोळी भाजून घेतली आणि या योजनेकडे दुर्लक्ष केले. तालुक्यातील नेते राज्यांत मंत्री राहिले, पण "साकळाई उपसा जल सिंचन योजने" साठी काहीच केले नाही. "गोड बोलणे आणि काम काहीच न करणे" अशी वृत्ती तालुक्यातील नेत्यांची झाली आहे.
योजनेसाठी ऐतिहासिक लढा उभारण्याची गरज
साकळाई उपसा जल सिंचन योजना होण्यासाठी आता ऐतिहासिक लढा उभारण्याची गरज आहे. अभ्यासू लोकांची टीम तयार करणे गरजेचे आहे. संपूर्ण अभ्यास पूर्वक आराखडा तयार करणे गरजेचे आहे. सगळ्या लोकांना विश्वासात घेवून ऐतिहासिक लढा उभा केला तर काहीतरी नक्की मार्ग निघेल. आणि श्रीगोंदा आणि नगर तालुक्यासाचा पाणी प्रश्न मार्गी लागेल.
Share your comments