Maharashtra Electricity Price News : नववर्षाच्या सुरुवातीलाच वीज ग्राहकांना झटका बसण्याची शक्यता आहे. विद्युत नियामक आयोगाने महावितरणला अतिरिक्त उत्पादन खर्चाचे ३७५ कोटी ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे ग्राहकांना जास्तीचे बील येणार असल्याने नागरिकांच्या खिशाला अधिकची कात्री लागणार आहे. इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली श्रेनिहाय ग्राहकांना १० ते ७० पैशापर्यंत प्रतियुनिटसाठी अधिकचे मोजावे लागणार आहे. हे शुल्क पुढील १० महिने ग्राहकांना द्यावे लागणार आहे.
विद्युत नियामक आयोगाने महावितरणला अतिरिक्त उत्पादन खर्चाचे ३८५.९९ कोटी ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी दिली आहे. सध्या महावितरणने ग्राहकांसाठी पंचवार्षिक योजनेंतर्गत पाच वर्षाचे विजेचे दर आधीच निश्चित केले आहेत. यावेळेस ही दरवाढ बीपीएल आणि कृषी ग्राहकांना देखील भरावी लागणार आहे.
ग्राहकांना इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली श्रेनिहाय ग्राहकांना १० पैसे ते ७० पैशापर्यंत प्रतियुनिट अधिकचे मोजावे लागणार आहेत. हे इंधन संयोजन शुल्क ग्राहकांना पुढील १० महिने मोजावे लागणार आहे.
दरवाढीची श्रेणी कशी असणार?
बीपीएल ग्राहकांना - १० पैसे प्रति युनिट
१ ते १०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांना - २५ पैसे प्रति युनिट
१०० ते ३०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांना - ४५ पैसे प्रति युनिट
३०० पेक्षा अधिक युनिटचा वापर असलेल्या ग्राहकांना - ६५ पैसे प्रति युनिट
महावितरण २०१९ पासून आतापर्यंत वीज खरेदीला नियंत्रणात ठेवू शकले नाही. कंपनीने यावर २६ हजार कोटींन पेक्षा अधिक रूपये अतिरिक्त खर्च केले आहे. कोविड काळ सोडाला तर वर्ष २०१९-२० ला ५ हजार ९७७ कोटी, वर्ष २०२१-२२ ला १० हजार ५४१ कोटी व वर्ष २०२२-२३ ला ११ हजार ५२४ अतिरिक्त खर्च झाला आहे.
दरम्यान, २०१९ पासून आतापर्यंत वीज खरेदी दर महावितरण नियंत्रणात ठेवू शकले नाही. तसंच यंदाच्या वर्षाचा महावितरणचा अतिरिक्त खर्च ३८५.९९ कोटी झाला आहे. यामुळे अतिरिक्त खर्चाचे वसुली ग्राहक किंवा सरकारकडून भरुन काढली जावू शकते. त्यामुळे विद्युत नियामक आयोगाने ग्राहकांकडून हा अतिरिक्त खर्च करायला परवानगी दिल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.
Share your comments