सध्या खेड्यापाड्यात सोसायटीच्या निवडणुकीचे वातावरण आहे. यामुळे प्रचाराचा धडाका सुरु आहे. असे असताना आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली जात आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची देखील निवडणूक आहे. यामध्ये श्री शिरसाई सहकार पॅनल शिर्सुफळ यांच्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टी दिल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये संस्थेच्या सर्व सभासद बंधु भगिनींचा प्रत्येक वर्षी रक्कम रुपये २ लाख पर्यंत नैसर्गिक व अपघाती मृत्युचा विमा उतरविणार असल्याचे यामध्ये सांगितले गेले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
तसेच सर्व सभासदांना खरीप हंगामासाठी अल्प दरात शेती खते. आधुनिक शेती याचा विकास करण्यासाठी सातत्याने शेतकरी कार्यशाळा, शेतकरी सहल अशी अनेक आश्वासने दिली गेली आहेत. यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे याची चर्चा गावाच्या पारावर रंगली आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यानंतर कोरोनाची लाट आली. यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लांबणीवर पडल्या. आता मात्र पुन्हा निवडणूका होत आहेत.
अलीकडच्या काळात गावातील सोसायटीच्या निवडणूकीत देखील मोठी चुरस निर्माण होत आहे. दोन्ही बाजूने प्रचार केला जातो. यामध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेकदा म्हटले जाते की आमदारकीची निवडणूक चांगली पण गावची लय वाईट. या निवडणुकीत कसला अंदाज लावता येत नाही. म्हणूनच निकाल लागेपर्यंत उमेदवारांना नीट झोप लागत नाही. त्यांची धाकधूक वाढतच असते.
सोसायटी ही शेतकऱ्यांच्या विकासाचा एक महत्चाचा दुवा मानला जातो, शेतकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम सोसायटी करते. शिर्सुफळ सोसायटी फार जुनी सोसायटी म्हणून ओळखली जाते. सुमारे १०३ वर्षापूर्वी सन १ ९ १ ९ मध्ये या सोसायटीची स्थापना केली गेली, तेव्हापासुन ते आज अखेर सोसायटीला १५०० पेक्षा जास्त सभासद संख्या झालेली आहे.
Share your comments