टाकळी हाजी सह माळवाडी, शरदवाडी, म्हसे या ग्रामपंचायंतीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचे कारण म्हणजे येथील दामुशेठ घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाकळी हाजीच्या पहिल्याच प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे वक्तव्य केले होते.
यामुळे या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. असे असताना त्यांनी शब्द खरा केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मात्र घोडे यांनी लग्न सोहळा संपन्न करत अगदी लग्नातील सर्व विधी पार पाडून त्यांचा शब्द खरा करून दाखविला. प्रचाराच्या पहिल्याच सभेत दामुशेठ घोडे यांनी लोकांना भावनिक आवाहन करताना ही निवडणूक नसून हे माझे लग्न आहे, मी चार नंबर प्रभागाचा नवरदेव आहे, असे म्हटले होते.
तसेच एक नंबर प्रभागमधून अरूनाताई माझी नवरी असून, दोन नंबर प्रभागातील त्यांची उभी असलेली सुनबाई ही आमची कलवरी आहे . तुम्ही सर्वजण माझे वऱ्हाडी आहात. निकाल म्हणजेच माझे लग्न असेल, असे म्हटले होते. यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आता उसातही काटामारी! 4581 कोटींचा घोटाळा, राज्यात खळबळ..
बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो, हे सिध्द करत निकाल लागल्यानंतर टाकळी हाजी येथील कुंड पर्यटन स्थळ येथील मंगल कार्यालयात जावून एक अनोखा विवाह सोहळा संपन्न केला. यामुळे या लग्नाची तालुक्यात चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो तुषार सिंचनासाठी मिळणार २५ हजार रुपये, असा घ्या लाभ..
वीज खात्यातील इंजिनीअरकडे उत्पन्नापेक्षा 280 पट संपत्ती, नोटांचे बंडल बघून अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे, पहा फोटो
शेतकऱ्यांनो आता सुष्म सिंचन संचसाठी मिळणार 50 हजार रुपये, असा घ्या लाभ..
Share your comments