1. बातम्या

5 राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, जाणून घ्या तेथील कोरोनाची परिस्थिती

देशात 14 फेब्रुवारीपासून ५ राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यात निवडणुका होत आहेत. सर्व राज्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे.

Corona

Corona

देशात 14 फेब्रुवारीपासून ५ राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यात निवडणुका होत आहेत. सर्व राज्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. मात्र, वाढत्या कोरोनारुग्णांची संख्या पाहता निवडणूक आयोगाने या ५ राज्यांमध्ये निवडणूक रॅलींवर बंदी घातली आहे. या राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊ ...

पंजाब

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,699 नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची 7,07,847 नोंदवली गेली आहेत. साथीच्या आजारामुळे आणखी 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेश

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,830 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात 24 तासांत 16,521 लोक बरे झाले आहेत. राज्यात 24 तासांत 19 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18,30,006 झाली आहे.

गोवा

गोव्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन 2,691 रुग्ण सापडले आहेत. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यातील एकूण मृतांची संख्या 3,602 वर पोहोचली आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये 24 तासात 3,727 लोकांना कोरोना झाला आहे. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 1270 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही 31 हजारांच्या पुढे गेली आहे.

English Summary: Election battles in 5 states, find out the situation of Corona there (2) Published on: 24 January 2022, 12:59 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters