मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. काल विधान परिषद निवडणुका (Legislative Council elections) पार पडल्या आणि आज शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह बाहेर आहेत. एकनाथ शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना नेते शिवसेनेला जोरदार धक्का देणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार होत आहे. अशातच नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये (Meridian Hotel in Gujarat) असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत.
विधान परिषद निकाल: पुन्हा देवेंद्रनीतीचा जलवा! भाजपला तब्बल 28 मते जास्त
काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे यांचा नाराज गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीलाच धक्का मिळण्याची शक्यता आहे.
7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यापासून 'इतका' वाढणार पगार
Share your comments