शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केले. आज या सरकारला एक महिना पूर्ण झाला. पण या सरकारविरोधात कोर्टात लढाई सुरू आहे. यामध्येच आता नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
राज्यात आज निवडणूक झाल्याच मतदार कुणाला कौल देणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दरम्यान, इंडिया टीव्ही-मॅटराईजच्य ओपिनियन पोलमधून याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
हे ही वाचा: राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; त्यांच्या वक्तव्याचे समर्थन...
बघा धक्कादायक कल
1. इंडिया टीव्ही-मॅटराईजच्य ओपिनियन पोलमधून या आकडेवारीनुसार राज्यात आज निवडणूक झाली तर २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपा पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरेल. मात्र भाजपाला बहुमत मिळणार नाही. भाजपाला १३४ जागा मिळू शकतील.
2. भाजपाचा मित्र असलेल्या शिंदे गटालाही चांगला जनाधान मिळू शकतो. शिंदे गटाला ४१ जागा मिळू शकतात.
3. राज्यात आज निवडणूक झाल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो. त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागेल.
4. राष्ट्रवादी काँग्रेसला ४४, काँग्रेसला ३८ जागा मिळतील. इतरांच्या खात्यात १३ जागा जाऊ शकतात.
हे ही वाचा: केंद्र सरकार खासगी नोकरदारांसाठी घेणार मोठा निर्णय; आणणार नवीन कायदा..
राज्यातील ५४ टक्के मतदारांनी २०२४ मध्ये भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार सत्तेत यावं असा कल नोंदवला. तर ३२ टक्के लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आपलं मत दिलं. येणार काळ निर्णायक ठरणार आहे.
हे ही वाचा: “राज्यपाल म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणजे भिकारी"; संजय राऊतांकडून राज्यपालांचा खोचक समाचार
Share your comments