बिहारमध्ये भाजप-जेडीयू युती तुटणे जवळपास निश्चित झाले असून भाजपनेही नितीशकुमार यांच्यापासून वेगळे होण्याचे मन बनवले आहे. दरम्यान, एक नवीन समीकरण तयार होत आहे. नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आता ते पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे सर्व 16 मंत्री राजभवनात जाऊन राज्यपालांकडं राजीनामे सादर केले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार सरकार पाडणार नाहीत किंवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. नितीशकुमार भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांना बडतर्फ करू शकतात. मंत्रिमंडळात 16 मंत्री भाजपच्या कोट्यातील आहेत, त्यापैकी दोन उपमुख्यमंत्री आहेत. दरवेळेप्रमाणेच नितीशकुमार यावेळीही काही नवीन पद्धत आणू शकतात. मंत्र्यांची हकालपट्टी झाल्यास नितीशकुमार यांना लगेचच महाआघाडीचा पाठिंबा मिळेल.
दरम्यान, जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांना फोडून भाजप महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये आपले सरकार स्थापन करणार असल्याचे समोर येत होते, याबाबत भाजपने तयारी देखील सुरु केली होती, मात्र नितीशकुमार यांनी भाजपचा हा डाव ओळखला आणि सगळी गेम फसली. याबाबत एक फोन रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाला होता.
ब्रेकिंग! बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीशकुमार सरकार पडले, भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा
माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्यावर पक्षाच्या वतीने बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आरसीपी सिंह यांनी शनिवारी संध्याकाळी त्यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सांगण्यात येत आहे की, गेल्या काही महिन्यांपासून नितीश कुमार यांच्यासोबत त्यांचे वाद सुरु होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
हेच भाजपने ओळखले असल्याचे सांगितले गेले आणि त्यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र याची कुणकुण नितीशकुमारांना लागली. महाराष्ट्रात देखील अशी गुप्त माहिती समोर येत होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि त्यांना सत्ता गमवावी लागली. जेडीयूने आरसीपी सिंह यांचे राज्यसभेचे तिकीट कापले होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद सोडावे लागले. आरसीपी सिंग हे केंद्रात जेडीयू कोट्यातील एकमेव मंत्री होते.
महत्वाच्या बातम्या;
मुख्यमंत्रीपद शिंदे गटाला देऊन फडणवीसांनी केली शाळा, महत्वाची खाती भाजपकडेच; वाचा खातेवाटप
आता शिंदे गटातील नाराज १२ आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात? पुन्हा तेच तिकीट आणि तोच तमाशा...
कस होणार महाराष्ट्राचं? नव्या मंत्रिमंडळात ५ मंत्री बारावी आणि १ मंत्री दहावी पास, बाकीचे...
Share your comments