शासन आपल्या दारी या अभियानात अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी 40 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबवली आहे. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये, यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना 3 हजार 982 कोटींचा लाभ देण्यात आला असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
सरकारी नोकरी सोडून कोरफडीची शेती सुरु, आता कोटींमध्ये उलाढाल..
शेतकऱ्यांनी घाबरु नये, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहेत. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. 53 वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे.
'साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करा'
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो शेतकरी सन्मान निधीत आता शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजारांची मदत मिळत आहे. जिल्ह्यात फक्त एक रूपयात 12 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवण्यात आला आहे. राज्यात दुर्दैवाने दुष्काळ आला तर यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. त्यामुळं सरकारची मदत, विम्याची मदत असेल या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.
मोदी सरकार देणार सर्वसामान्य लोकांना आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, जाणून घ्या...
Share your comments