सध्या अनेक गोष्टींमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे, यामुळे याचा मानवी शरीरावर वाईट परिणाम होत आहे. यामुळे अनेक भेसळयुक्त पदार्थ खाऊ नयेत, असे आपल्याला आपले डॉक्टर सांगत असतात. असे असले तरी ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. असे पदार्थ खाल्ले तर आपल्याला अनेक आजारांचा सामना देखील करावा लागतो. असे असताना अंडे देखील भेसळयुक्त आहे असे अनेकदा म्हटले जाते. यामुळे याबाबत सत्यता माहिती असणे गरजेचे आहे. यामुळे अनेकांचे गैरसमज देखील होत असतात.
आता अंड्याचे बघायचे झाले तर अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच होय. अंड्याच्या आत पांढऱ्या रंगाचा पापुद्रा म्हणजे एक पातळ लेयर असतो, ज्याला आपण shell membrane असे म्हणतो. त्याच्या आत पांढरा बलक आणि सर्वात मध्यभागी पिवळा बलक असतो. अंड्याच्या कवचामध्ये अतिसूक्ष्म अशी अनेक छिद्रे असतात. या छिद्राद्वारे हवेची देवाणघेवाण होत असते. यामुळे अंडे शिळे होण्याचा धोका असतो, आणि ते होते देखील. जसे अंडे शिळे होत जाते तसतशी बाहेरील हवा अंड्यात शिरते व अंड्यातील आद्रॆता बाहेर टाकली जाते.
तसेच कोरडी हवा आत गेल्याने आणि अंड्यातील ओलेपणा सतत बाहेर पडल्यामुळे आतील पदार्थ काहीसे शुष्क होत जातात. यामुळे अंड्याचे वजन कमी होऊन असे अंडे पाण्यात टाकल्याने ते पाण्यावर तरंगते. अशी शिळी अंडी फोडल्यावर कवचाच्या आतील पृष्ठभागातील आवरण हे शुष्क व जाडसर होऊन प्लाॅस्टिक सारख वाटत. यामुळे अनेकांना वाटते की हे अंडे प्लाॅस्टिकचे असल्याचे दिसून येते, अनेकांनी तर यामुळे अंडीच खाणे सोडून दिले आहे.
अंड्यातील ओलावा बाहेर गेल्याने ते तंतू जाड दोऱ्यासारखे दिसू लागतात. बरेचदा अंडी फ्रिजमधून काढून लगेचच वापरली असताही असा प्रकार दिसतो. आणि इथेच आपला गैरसमज होतो. याचाच अर्थ आपल्याकडे प्लाॅस्टिकची अंडी बनली जात नाही आणि विकलीही जात नाहीत. म्हणजेच अंड हे भेसळमुक्त आहे. यामुळे आपल्या शरीराला एक चांगली ऊर्जा मिळते. यामुळे अंड्याचा आपल्या आहारात नेहेमी समावेश असावा.
Share your comments