गेल्या बरेच महिन्यांपासून खाद्य तेलाचे दर गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला प्रचंड प्रमाणात ताण सहन करावा लागत आहे.मागील काही दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या दरांमध्ये थोडाफार दिलासा मिळाला होता
.परंतु आत्ता दर भडकण्यास सुरुवात झाली आहे. यामागे बरीच आंतराष्ट्रीय स्थानिक बाजारपेठेतीलपरिस्थिती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय कारणांचा विचार केला तर सध्या रशिया आणि यूक्रेन त्यांच्यामध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती या दरवाडी मागे एक प्रमुख कारण आहे त्यासोबतच मलेशियामध्ये पाम उत्पादन घडल्याने त्यातील पाम तेलाची आयात वरत्याचा परिणाम झालेला आहे.
जर आपल्या भारताच्या खाद्यतेल परिस्थितीचा विचार केला तर भारत 68% खाद्यतेलाची आयात बाहेर देशांकडून करतो. यामधील सूर्यफूल तेल हे युक्रेन मधून तर पाम तेल हे मलेशिया कडून आयात केले जाते. परंतु सध्या रशिया आणि युक्रेन त्यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा जगभरातील आयात आणि निर्यातीवर होत आहे.
तसेच युक्रेन मधून होणारा सूर्यफूल तेलाचा पुरवठा देखील फार कमी प्रमाणात होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊन मुळे झाडांवरील पाम तोडतान आल्याने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेल्यामुळे तेथील पाम तेलाची आयात देखील प्रभावित झाली आहे.
Share your comments