मागील बऱ्याच महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. कधी नव्हे एवढे खाद्य तेलाचे दर या वर्षी पाहायला मिळाले. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने सध्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
खाद्य तेलामध्ये मोहरी, सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाची किंमत देखील घसरण झाली आहे. या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मतानुसार, गेल्या जानेवारी महिन्यापासून मोहरी तेलाच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील खाद्य तेलाच्या दरात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने त्याचा परिणाम हा शेंगदाणा तेलाच्या दरावर देखील पाहायला मिळत आहे. तसेच राजस्थान मधून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सोयाबीन तेलाच्या दरात देखील घट झाली आहे.
यावर्षी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याचा फटका इतर पिकांसोबत सोयाबीन ना देखील मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटल्यामुळे सोयाबीन तेलाच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु ते बाजारपेठेतयायला आज उशीर असून तोपर्यंत सोयाबीनच्या तेलात तेजी कायम राहू शकते. बाजारपेठेतील तज्ञांच्या अंदाजानुसार उद्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्या कारणाने काही प्रमाणात तेलाच्या किमतीघसरल्याचे पाहायला मिळत आहे.
परंतु हे आशादायी चित्र कायम राहणार नसून काही दिवसानंतर खाद्यतेलाच्या दरात पुन्हा तेजी येण्याचे संकेत आहेत. जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर पामतेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे त्यासोबतच सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणे चे दर वाढले असल्याने येणाऱ्या काही काळात तेलाचे दर वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.(स्रोत-tv9मराठी)
Share your comments