राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल व एफएस प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी ईडीच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी 12 मे रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. आयएल आणि एफएस (IL & FS) या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. यामुळे आता चौकशी होणार आहे.
या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती.
आता पीक कर्जासाठी 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार
यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. यामुळे आता राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.
उसाची शेती करताना माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करू नका...
यामुळे आता काय होणार हे येणाऱ्या काळात समजेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते अडचणीत येत आहेत. याआधी हसन मुश्रीफ यांची देखील नोटीस आली असून चौकशी सुरू आहे.
पुण्यात 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त, अन्न व सुरक्षा विभागाची मोठी कारवाई..
पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एका महिन्यात १३०० कोटींचे पीककर्ज, शेतकऱ्यांना दिलासा..
नाफेड अंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाकडून हमीदराने चौदा हजार क्विंटल हरबरा खरेदी
Share your comments