इंडोनेशियामध्ये भूकंपामुळे 162 लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. लोक रडत असून आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. इंडोनेशियामध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. इंडोनेशियातील भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत १६२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर 300 हून अधिक जखमी झाले आहेत.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे हा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी होती. त्यामुळे शहरातील इमारती हादरल्या. परिस्थिती अशी होती की लोक रडत होते आणि आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत होते. ताडपत्रीवर मृतदेह पडलेले होते. लोक त्यात आपल्या ओळखीचे लोक शोधत होते.
अजूनही अनेक लोक घटनास्थळी अडकले आहेत, वेळ पडल्यास जखमी आणि मृतांची संख्या वाढेल. दुकानदार डी. रिस्मा आपल्या ग्राहकांशी बोलत असताना अचानक भूकंपाचा धक्का बसला. ते म्हणाले की, हादरा जोरदार होता, त्यामुळे रस्त्यावर वाहने थांबली. मला तीनदा हादरे जाणवले पण पहिला धक्का सर्वात जास्त होता. माझ्या दुकानाच्या शेजारील दुकानाचे छत पडले.
धरणे अजून शंभर टक्के! शेतकऱ्यांची रब्बीची चिंता मिटली..
सियांजूरच्या स्थानिक प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले की बहुतेक मृत्यू रूग्णांना दाखल करण्यात आलेल्या रूग्णालयात झाले आहेत आणि ते रूग्णालय अवशेष बनले आहे. त्यांनी इंडोनेशियन मीडियाला सांगितले की, भूकंपानंतर शहरातील सयांग रुग्णालयात वीज नव्हती, त्यामुळे डॉक्टरांना पीडितांवर त्वरित उपचार करता आले नाहीत.
ज्यामध्ये काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ते म्हणाले की रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे अधिक आरोग्य कर्मचार्यांची तातडीची गरज होती परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे. यामध्ये आता किती भारतीय आहेत, याचा आकडा अजून समोर आला नाही. यामुळे ही परिस्थिती खूपच भयानक आहे.
महत्वाच्या बातम्या;
Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी एक चमत्कार, शेतकऱ्यांना होतोय फायदा..
आम्हाला तुमची वीज नको आणि आमच्या शेतात तुमचा खांब नको! शेतकऱ्यांनी महावितरणला आणले जाग्यावर..
ब्रेकिंग!नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Share your comments