केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच भारत किसान सम्मान निधि योजना ही होय.आपल्याला माहिती आहेत की या योजनेच्या माध्यमातूनएका वर्षाला सहा हजार रुपयेतीन हप्त्यांत विभागूनशेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. आता बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा दहाव्या त्याची प्रतीक्षा आहे परंतुबारा कोटी पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
पीएम किसान सम्मान निधि योजना 2021 मध्ये सरकारने मोठा बदल केला असून 15 डिसेंबर पर्यंत येणाऱ्या दहाव्या हपत्याचे पैसे तुम्हालाई केवायसी पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाहीत.म्हणून सगळ्यांनी ई-केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे.
ई केवायसी कसे करावे?
- ई केवायसी करण्यासाठी प्रथम https://pmkisaan.gov.in/या संकेतस्थळावर जावे.
- येथे उजव्या कोपऱ्यात सर्वात वरतीई केवायसी लिहिलेलं आहे त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर आधार नंबर आणि इमेज कोड टाकून सर्च बटणावर क्लिक करा.
- नंतर आधार सोबत लिंक मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी टाका.
- सर्व बरोबर असेल तर ई केवायसी पूर्ण होईल नाहीतर इन व्हॅलिड असे लिहनयेईल.
- जर प्रक्रिया इन व्हॅलिड आली तर आधार सेवा केंद्रावर जाऊन काय समस्या असेल तर तीठीक करावी.
यांना नाही मिळत पी एम किसान योजनेचा लाभ
- कुटुंबातून कुणीही टॅक्स पेयर असेल
- शेतीचे स्वतः मालक नसणे.
- शेती नावावर नसणे.
- शेतीची आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असणे.
- जमिनीचा मालक आहे पण सरकारी कर्मचारी आहे किंवा निवृत्त झाला आहे असे
- विद्यमान आणि माजी खासदार, आमदार किंवा मंत्री
- प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर,वकील,इंजिनीयर, सीए किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक
- शेतीचा मालक आहे पण दहा हजार रुपयांपेक्षा जास्त महिना पेन्शन मिळत असेल तर
Share your comments