पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून नऊ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
आता 10 व्याहपत्याची वाट शेतकरी पाहत आहेत. हा हप्ता एक जानेवारीला जमा होणार असे म्हटले जात आहे.
पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या नियमांमध्ये शासनाने बरेच बदल केले आहेत. त्यातीलच एक नवीन नियम म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ईकेवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली असेल अशा शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याचा त्याचा लाभ मिळणार आहे.जर तुम्हाला पीएम किसान योजना साठी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर पुढील पायऱ्यांचा अवलंब करून तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
ई केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया
- यासाठी अगोदर पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- तिथे उजव्या हाताला होम पेज वर खालील बाजूस तुम्हाला फार्मर्स कॉर्नर असा पर्याय दिसेल.
- त्याखाली एक बॉक्स आहे तिथेही केवायसी म्हटले आहे.
- ई केवायसी वर क्लिक करावे.
- त्यानंतर आधार ई केवायसी चे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक पेज ओपन होईल.
- त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक नोंदवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या कोड भरून सर्च बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक ओटीपी येईल.
- हा ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरच येईल.
- नंतर हा ओटीपी सबमिट करायचा आहे आणि ऑथेंटिकेशन साठी सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही ऑथेंटिकेशन साठी सबमिट बटन वर क्लिक केल्या बरोबर तुमचे पी एम किसान योजना साठी ईकेवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.
Share your comments