1. बातम्या

ई-मोजणी क्रांतिकारी, आहेत अनेक फायदे

राज्यभरातील शेतजमिनीची मोजणी करून नकाशे, सातबारा अद्ययावत करणे ही आताच्या काळातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हटले तर वावगे ठरू नये.आपल्या देशात एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला इंग्रजांच्या काळात संपूर्ण भूमापनाचे काम झाले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतात एकदाही असे भूमापन झाले नाही.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
E-counting is revolutionary

E-counting is revolutionary

राज्यभरातील शेतजमिनीची मोजणी करून नकाशे, सातबारा अद्ययावत करणे ही आताच्या काळातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हटले तर वावगे ठरू नये. आपल्या देशात एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला इंग्रजांच्या काळात संपूर्ण भूमापनाचे काम झाले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतात एकदाही असे भूमापन झाले नाही.

या देशात इंग्रजांनी जमीन मोजून केलेल्या हद्दी, खुणा अनेक ठिकाणी आता दिसत नाहीत. त्यामुळे जमीन मोजणी करताना अडचणी येतात. जमिनीची रीतसर मोजणी करून देण्यासाठी तालुका स्तरावर भूमी अभिलेख कार्यालये आहेत. असे असताना बहुतांश ठिकाणी जमीन मोजणीसाठी अर्ज करूनही ठरावीक कालमर्यादित मोजणी करून दिली जात नाही.

शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अनेक हेलपाटे मारल्यानंतर मोजणीचे काम कसेबसे उरकले जाते. दुर्दैवी बाब म्हणजे सरकारी मोजणीतही अनेक चुका होतात. त्यामुळे मोजणीनंतर वाद मिटण्याऐवजी त्यात भरच पडत आहे. मोजणी योग्य होत नसल्याने गावकी भावकीतील शेतकऱ्यांमध्ये वाद विवाद वाढतच जात आहेत. अनेक वेळा हे वाद विकोपाला जाऊन त्यात काही शेतकरी आपला जीव देखील गमावून बसत आहेत. शेतजमिनीचे वाद नाहीत, असे गाव राज्यात शोधूनही सापडणार नाही.

अनेक ठिकाणी सात-बारावरही चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत त्यातूनही शेतशेजारी तसेच भावकीत वाद आहेत. अशावेळी ई-मोजणीचा पथदर्शक प्रकल्प राज्यात राबविला जाणार असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास ई-मोजणीचा विस्तार राज्यभर केला जाणार आहे. तब्बल एका शतकानंतर राज्यात एकत्रित मोजणीचे काम झाले तर हा निर्णय क्रांतिकारीच म्हणावा लागेल.

ऊसतोडणीसाठी मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट, अंतिम टप्यात पैशांची मागणी

शेतजमीन आणि त्यासंबंधात आपल्या मालकीचा दस्तऐवज सातबारा हे दोन्ही शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यातच स्थावर मालमत्ता जमिनीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने या दोन्हीना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. शेतकऱ्यांच्या अशा जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयांतीलच वाढते वाद पाहता राज्यभरातील शेतजमिनीची मोजणी करून नकाशे सातबारा अद्ययावत करणे ही आताच्या काळातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हटले तर वावगे ठरू नये.

शेतजमिनीची खरेदी विक्री, त्याअनुषंगिक मोजणी वडिलोपार्जित वाटण्यांच्या अनुषंगाने मोजणी, जमिनीचे नकाशे, दस्त नोंदणी, सातबारा उतारे ह्या भूमी अभिलेखाशी संबंधित सेवांचा शेतकऱ्यांशी वारंवार संबंध येतो. या सेवा प्रदान करण्याची प्रचलित पद्धत अत्यंत किचकट असून, त्यात गैरप्रकारही बोकाळलेले आहेत. हे सर्व शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढविण्याचेच काम करतात. अशावेळी ई-मोजणी पथदर्शक प्रकल्पाला तत्काळ सुरुवात करायला हवी. यापूर्वी राज्याच्या शेतजमिनीच्या एकत्रित मोजणीच्या घोषणा अनेकदा झाल्या.

परंतु या सर्व घोषणा हवेतच विरून गेल्या, तसे या पथदर्शी प्रकल्पाचे होणार नाही, ही काळजी देखील घ्यावी लागेल. त्याकरिता या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि निधी याची शासनाकडून तत्काळ पूर्तता झाली पाहिजेत शेतजमीन मोजणी कालानुरूप अद्ययावत होत गेली. परंतु मानवी हस्तक्षेपाने या सर्व पद्धतीत काही ना काही त्रुटी दोष राहिले आहेत.

आता गाई-म्हशीचे शेणही देईल बंपर नफा, या पद्धतीने करा वापर..

आताची ई-मोजणी ही मानवी हस्तक्षेपाशिवाय उपग्रहाच्या साह्याने जीपीएस प्रणालीने होणार आहे. त्यामुळे अशा मोजणीत काही त्रुटी चुका दोष राहणार नाहीत. त्याही पुढील बाव म्हणजे अक्षांश रेखांशसह होणाऱ्या या मोजणीचे डिजिटल नकाशे शेतकऱ्यांना मिळतील.

हे नकाशे शेतकरी संगणक अथवा मोबाइलवर कुठेही पाहू शकतील. एकंदरीतच जमीन मोजणी प्रणाली अर्ज करण्यापासून ते डिजिटल नकाशा मिळेपर्यंत ऑनलाइन होणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, श्रम आणि मुख्य म्हणजे मनस्ताप वाचणार आहे. अशा प्रकारच्या मोजणीस शेतकऱ्यांनी देखील सहकार्य करावे.

मोगऱ्याची शेती आहे खूपच फायदेशीर, शेतकऱ्यांना होतोय फायदा
महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांनो काळजी घ्या
तरुणीने अभ्यासासोबतच डुकर पालनातून कमवले लाखो रुपये

English Summary: E-counting is revolutionary, has many advantages Published on: 16 March 2023, 03:26 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters