दसरा म्हणजे आपुलकीचा सण जे की या सनाचे आणि शेतीचे अगदी जुने संबंध. दसरा सणाला आपण आपल्या शेतीमध्ये असणारी जुनी अवजारे तसेच शेतीत असणारे धान्य मंदिरात घेऊन आपण पूजन करतो. शेतीला लागणारी सर्व अवजारे असो किंवा शेतीमध्ये पिकवलेले धान्य असो ते आपण दसऱ्याला वाटप ही करतो. घरामध्ये असणारे धान्य जसे की गहू, मका, बाजरी हे सर्व मातीमध्ये टाकतात आणि त्याची पूजा केली जाते. अगदी अन्नसमृद्धीचा दसरा साजरा केला जातो.
भारतामध्ये दसरा वेगवेगळ्या भागात थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर पश्चिम बंगालचा दुर्गोत्सव खूप प्रसिद्ध आहे तसेच मध्य भारतात देवीची उपासना करण्यासाठी पुरुष नऊ दिवस उपास करतात. कर्नाटक राज्यात म्हैसूरचा दसरा खूप ऐतिहासिक आहे तर ओडिशा राज्यात या काळात नवाखाई उत्सव साजरा केला जातो. सर्व गावे एकत्र येतात आणि आनंदाणे साजरे करतात.
दसरा सणादिवशी शेतात आलेले नवीन धान्य, कणसे, आपट्याची पाने तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे जसे की पेरणीसाठी पाभर इत्यादी सर्व गोष्टी घरातील माणूस घेऊन मंदिरात जातो आणि त्याची पूजा करतो. जे की नंतर पुरुष घरी आला की नंतर स्त्रिया ओवळतात व त्यानंतर सर्व घरोघरी जाऊन आपट्याची पाने वाटली जातात. जे की या दिवशी घरोघरी सर्वांच्या आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. ज्या प्रकारे आपल्या भागात फुलांचे तोरण लावले जाते त्या प्रकारे आदिवासी भागात शेणाने बनवलेल्या गोळ्यातून तसेच रानातल्या फुलातून व पानाची सजावट केली जाते. तसेच घरोघरी गोड जेवण बनवले जाते.
हेही वाचा:-मोसंबी पिकासाठी आहे विमा योजना, मात्र ही कागदपत्रे आहेत आवश्यक
आदिवासी भागांमधील तरुण मुली भोडाई नावाचा खेळ या काळामध्ये खेळत असतात. जे की गावातील सर्व मुली तांदूळ, पैसे गोळा करतात. नवरात्रीमध्ये या भागामध्ये हा क्रम चालू असतो जे की त्यांच्यासोबत कलश असतो. त्या कलश मध्ये शेतात असणारी नाचणी, वरईची हिरवी कणसे, भाताच्या लोंब्या, खुरासनीची फुले तसेच कुरडूची भाजी असे सर्व कलश मध्ये टाकून ते डोक्यावर घेऊन नाचत असतात तसेच गाणी म्हणतात. हा कलश म्हणजेच भोंडई.
गडचिरोली मधील आदिवासी भागामध्ये दरवर्षी एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे अशी की लहान मुले मुली एकत्र एकत्र येतात तसेच मोठी लोक त्यांना सीमेवर घेऊन जातात आणि भरलेला कलश रस्त्यावर ओतून सरळ रस्त्यात आखली जाते आणि त्या आखलेल्या रेषेचे पूजन करतात. जे की यामध्ये जास्त जास्त मुली होत्या म्हणजेच नव्या पिढीला सीमेची माहिती दिली जात आहे.
धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये दसऱ्याच्या दिवशी महिला तसेच पुरुष सकाळी उठून एकत्र जमतात आणि वाद्यांच्या तालात वाजत गाजत निघतात. जो की हा जमाव सकाळी नदीच्या दिशेने जातो. जे की काही महिलांच्या डोक्यावर पाट्या असतात जे की यामध्ये मोठ्या काकड्या असतात. हे सर्व जण गावच्या नदीवर जातात मग त्या ठिकाणी पुरुष अंघोळ करतात. नदीची पूजा करतात आणि मोठ्या काकड्या कापून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर घरी जातात आणि बोकड कापली जातात. जेवढी घरे आहेत तिथे वाटे केले जातात. रात्री घरोघरी मटण शिजवले जाते. जे की या भागामध्ये सर्व लोक एकत्र येतात.
भारतामध्ये दसरा वेगवेगळ्या भागात थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर पश्चिम बंगालचा दुर्गोत्सव खूप प्रसिद्ध आहे तसेच मध्य भारतात देवीची उपासना करण्यासाठी पुरुष नऊ दिवस उपास करतात. कर्नाटक राज्यात म्हैसूरचा दसरा खूप ऐतिहासिक आहे तर ओडिशा राज्यात या काळात नवाखाई उत्सव साजरा केला जातो. सर्व गावे एकत्र येतात आणि आनंदाणे साजरे करतात.
Share your comments