बळीराजासाठी पाऊस हा खूप गरजेचा असतो कारण पाऊसाच्या जीवावरच शेतकरी शेती करत असतो. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी पाऊसाने जोरदार कमबॅक केलेला आहे. तसेच राज्यातील काही भागात ढगफुटी होऊन शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे.
राज्यात पावसाचा जबरदस्त कमबॅक:-
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला परंतु नंतर काही दिवस पावसाने मोठी दांडी मारली होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खरिपातील पिके रानात करपून जाऊन शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. परंतु गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाने पुनः जोरदार कमबॅक केला आहे.
राज्यातील काही ठिकाणी तर ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा झाले आहे पुणे विभागातील बारामती तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी झाल्याचे दिसून येत आहे तसेच सातारा मधील काही ठिकाणी सुद्धा ढगफुटी झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस चालू आहे यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हाूर, नाशिक, नागपूर , लातूर या ठिकाणी जबरदस्त पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाने येणारे 2 दिवस खूप महत्वाचे आहेत या 2 दिवसात राज्यात पाऊसाचा वेग वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. येणाऱ्या 2 दिवसात राज्यातील विविध भागात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, महाड, कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा:-घ्या जाणून जीप कंपास च्या नवीन इडिशन चे फीचर्स, किमतीमध्ये केली मोठ्या प्रमाणात वाढ...
तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी यलो अलर्ट आणि रेड अलर्ट सुद्धा जारी केला आहे या मद्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये सोलापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड,बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि राज्यातील यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच येणाऱ्या 2 दिवसात शेतीची खरीप हंगामाची कामे पूर्ण करून घ्यावी असे शेतकरी वर्गाला सांगितले आहे.
Share your comments