MilK Rates
गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या भावात सतत वाढ होताना आपल्याला दिसत आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्य लोकांच्या दैनदिन जीवनात झालेला आहे शिवाय जनावरांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत शिवाय या मुळे शेतकरी वर्गाला तेवढा मुबलक फायदा मिळत आहे हे अगदी खरे आहे.
कोरोनाच्या काळापासून दुग्ध व्यवसाय हा मोडकळीला आला होता पाण्याच्या भावात दूध मिळत असल्याने शेतकरी वर्गाला पशुपालन व्यवसाय करणे आहे दुग्व्यवसाय करणे परवडत नसे. परंतु शेतकरी बांधवांचे दिवस आता बदलले आहेत. आता गेल्या काही महिन्यांपासून दुधाच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे.
दुधाचे भाव जरी वाढले असले तरी त्यामागील खर्च सुद्धा त्याच पटी मध्ये वाढत सुद्धा आहे. यामधे महागाई चाऱ्याच्या वाढत्या किमती, विविध प्रकारच्या पेंडी औषधे दवाखाने यांचा सुद्धा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु हे सर्व होऊन सुद्धा दुग्ध उत्पदक शेतकरी आनंदात आहेत.
दुधाचे भाव सतत वाढत असल्यामुळे जनावरांच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यामधे गाई, म्हैशी, जर्शी गाई यांना मोठ्या प्रणात मागणी आहे. गाभण गाई ची किंमत ही 50 ते 60 हजार रुपयांच्या पुढेच आहे तसेच कालवडी यांच्या सुद्धा किमती मुबलक वाढल्या आहेत.
गाई आणि म्हैस घ्यायची म्हटल की 50000 ते 2लाख रुपये एवढ्यापर्यंत गाईंच्या आणि म्हैशीच्या किमती वाढल्या आहेत. तसेच जनावरांचे बाजारभाव सुद्धा अत्यंत कडक होत आहे शिवाय दुधाचे भाव वाढल्याने आणि दूध उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात गाई आणि म्हैशीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
तसेच येत्या काही दिवसांपासून दुधाच्या भावामधे 7 रुपये प्रति लिटर एवढी वाढ होणार असल्यामुळे जनावरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. शिवाय फायदा सुद्धा मुबलक मिळणार आहे. शिवाय सोलापूर, सांगोला, अकलूज, काष्टी, अहमदनगर यांसारख्या जनावरांच्या बाजारात आजकाल गाई घेण्यासाठी माणसांची पळापळ होताना दिसते आहेत.
Share your comments