सध्या परतीच्या पावसामुळे राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची हाताला आलेली पिके वाया गेली आहेत. पावसाने टोमॅटो (Tomato) पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे.
यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. याचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 35 ते 40 रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हाच दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे दर अजून वाढण्याची शक्यात आहे.
उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत असतो मात्र पावसामुळे त्याची आवक कमी झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचा ओघ पाहता हा दर चढाच राहिल अशी शक्यता आहे. पावसामुळे अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळं शेतमालाचं उत्पादन देखील घटत आहे.
आपत्ती मदत रकमेत ५० टक्क्यांनी वाढ, आता पूर-पाऊस आणि पिकांचे नुकसान झाल्यास अधिक भरपाई दिली जाणार
दरम्यान, बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून दरांमध्ये वाढ होत आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची एपीएमसी मार्केटमध्ये आवक होत आहे. पावसामुळं टोमॅटोचे 50 टक्के उत्पादन घटलं आहे. त्यामुळं एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
पावसात जनावरे दगावली तर मिळणार मदत, शेती पाण्याखाली शेती गेली की मिळणार तत्काळ मदत..
मागील आठवड्यात 30 ते 32 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध असलेले टोमॅटो आता 35 ते 45 रुपयांवर विकले जात आहेत. सततच्या पावसामुळं आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत. कोथिंबीर देखील महाग झाली आहे. यामुळे अनेकांचे बजेट कोसळले आहे. आता पाऊस थांबल्यावर दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
16 व्या पॅन-आशिया शेतकरी प्रोग्राममध्ये बायोटेक कॉर्न उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद, आधुनिक शेतीचा होतोय फायदा..
आज स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी काय घोषणा करणार? ऊस उत्पादकांचे लागले लक्ष
आता जमीन खरेदीसाठी सरकार देणार 100 टक्के अनुदान, जाणून घ्या सविस्तर..
Share your comments