1. बातम्या

दिवाळी मुळे हळदीच्या मागणीत वाढ, दरामध्ये सुद्धा मोठा बदल

शेतकऱ्याच्या पिकांना भाव हा ठराविक वेळेत मिळत असतो. त्यासाठी शेतकरी वर्गाने नियोजन पद्धतीने शेती करावी किंवा लागवड करावी. शेतकरी वर्गाला सर्वात जास्त पैसा नगदी पिके मिळवून देत असतात. परंतु काही वेळेस हीच नगदी पिके शेतकरी वर्गाला मातीत सुद्धा घालतात.नगदी पिकांमध्ये ऊस कापूस आले हळद निळ आणि तंबाखू या पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. बाजारात या पिकांना भाव सुद्धा योग्य मिळत असतो.

किरण भेकणे
किरण भेकणे
turmeric

उद्योग प्रक्रिया क्षेत्रात हळदीची मागणी :

सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक पिकांचे तसेच भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये कोथिंबीर, भाजी, कांदा आणि मसाल्याचे पदार्थ यांचे भाव मोठ्या  प्रमाणात  वाढलेले आहेत.ऐन दिवाळी मध्ये हळदीच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे भाव सुद्धा खूप वाढला आहे. दिवाळी मध्ये फराळ आणि उद्योग प्रक्रिया क्षेत्रात हळदीची मागणी वाढल्यामुळे हळदीचा भाव सुद्धा 200 रुपयांपर्यंत वाढलेला आहे.

राज्यातील अनेक बाजार समित्या दिवाळी मध्ये बंद होत्या. परंतु नांदेड आणि वसमत या बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात 50 ते 100 रुपयांपर्यंत वाढ  झालेली  होती. सप्टेंबर  आणि ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे खूप नुकसान झाले होते. सतत च्या पडणाऱ्या पावसामुळे हळद उत्पादक क्षेत्रात मूळकूज आणि कीड आणि रोगाने हळदीचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ह्या वर्षी हळद उत्पादनात सुद्धा 15 टक्क्यांपर्यंत घट होणार आहे.

मागणी वाढल्यानंतर हळदीच्या भावात चढ:-

सणासुदीच्या काळात हळदीची मागनी वाढल्यामुळे दारात सुद्धा बदल झालेले आहेत. मागणी चे प्रमाण वाढल्यामुळे हळदीचे भाव हे 4500 ते 8600 रुपये प्रती क्विंटल एवढे झाले आहेत तसेच तामिळनाडू राज्यात हळदीचे भाव हे 6000 ते 8600 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

English Summary: Due to Diwali, the demand for turmeric has increased and so has the price Published on: 05 November 2021, 02:24 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters