भारत हा कृषी प्रधान देश म्हणून साऱ्या जगभर ओळखला जातो. विशेष म्हणजे आपल्या देशात पिकांचे उच्चांकी उत्पादन घेतले जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पिके ही हांगमादरम्यान घेतली जातात. परंतु काही पिकांवर प्रकिया करून ती जास्त वेळ टिकवली सुद्धा जातात. अशी अनेक पिके आहेत.
भारतात फळशेती सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते शिवाय वेगवेगळी फळे बाहेरील देशात सुद्धा निर्यात केली जातात यामधे केळी, द्राक्षे, आंबा, कलिंगड, पपई, तरबुज इत्यादी फळे निर्यात केली जातात. बऱ्याच वेळी जर द्राक्षांना बाजारात मागणी आणि चांगला भाव नसेल तर त्यापासून बेदाणे म्हणजेच मनुके तयार केले जातात. सध्या दिवाळी आणि दसरा हे सण जवळ येत असल्यामळे बेदाण्याच्या मागणीत तसेच भावात वाढ होताना दिसत आहे. बेदाणा निर्मती साठी राज्यात तासगाव, सांगली ही शहरे प्रसिद्ध आहेत
हेही वाचा:-Tata ने भारतात केले Nexon चे नवीन Varient लाँच, जाणून घ्या फीचर्स
सध्या बाजारात बेदाण्याला बाजारात 140 ते 150 रुपये प्रतिकीलो एवढा भाव असल्याचे समजत आहे. शिवाय बेदाण्याच्या वाढत्या मागणी मुळे बेदाण्याच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झालेली दिसून येते. शिवाय येणाऱ्या काही दिवसांमध्ये बेदाणे आणि ड्राय फ्रूट चे भाव वाढतील असा अंदाज सुद्धा केला जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये दसरा आणि नंतर दिवाळी या सणासुदीच्या काळामुळे बेदाणे खरेदी साठी व्यापारी वर्गाची झुंबड उडाली आहे.
हेही वाचा:-जाणून घ्या रात्री झोपन्यापूर्वी गुळ खाण्याचे फायदे.
राज्यातील सांगली, तासगाव, पंढरपूर या बाजार समितीत होणाऱ्या सौद्यांमध्ये सुमारे २००० ते ३००० टन बेदाण्याची आवक रोज होताना दिसत असून त्याची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्या सर्व बाजारपेठेत उच्च दर्जाच्या बेदाण्याला व्यापारी अधिक पसंती देत असल्याने बेदाण्याचा अपेक्षित उठाव होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात सुधारणा आहे. त्यामुळे बेदाण्याच्या भावात सुधारणा होताना दिसत आहे. तसेच दिवाळी नंतर च्या 1 महिन्याच्या काळात सौदे बंद असतात त्यामुळे दिवाळी पर्यंत बाजारात बेदाण्याची अधिक विक्री होईल अशी अपेक्षा व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.
Share your comments