1. बातम्या

कोरोनामुळे जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना केंद्र सरकार देणार 50 हजार रुपयांची मदत

देशात कोरोना मुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला.त्यामुळे बरीच कुटुंबे घरातील कर्ता पुरूष गेल्याने संकटात सापडले आहेत.त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
corona compansation

corona compansation

 देशात कोरोना मुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला.त्यामुळे बरीच कुटुंबे घरातील कर्ता पुरूष गेल्याने संकटात सापडले आहेत.त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

.या आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार ते पाच लाख रुपयांची मदत सरकारने द्यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. परंतु इतकी मदत देणे शक्य नसल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले होते.सरकारकडून केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला होता.  परंतु या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सरकारला सूचना दिल्या होत्या की मृतांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक मदत मिळायला हवी हो यासाठी मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये मदत देणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.

 केंद्र सरकारने असे धोरण घेतल्याने कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही रक्कम देण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.न्यायालयाने सरकारला यावर अनेक वेळा विचारले होते त्यानंतर सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

 

नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाख रुपये मदत देण्यात येते. मात्र कोरोना चे संकट  संकट वेगळ्या प्रकारचे आहे असे सरकारने शपथ पत्रात म्हटले आहे.त्यानंतर न्यायालयाने सरकारचा दावा मान्य केला.तसेच मृतांच्या कुटुंबीयांना किती मदत घ्यावी ते सरकारने ठरवावे असे न्यायालयाने म्हटले होते.

English Summary: due to corona mortal people family compansation of 50 thousand Published on: 22 September 2021, 09:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters