अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी कोरडी जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईपोटी रक्कम राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेच्या तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा मुहूर्त लांबणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठी १० हजार कोटींचा पॅकेज मंजूर केले. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
मात्र राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक या विधानपरिषदेच्या मतदार संघातील ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये ही मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक आहे. येत्या शुक्रवारपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र सरकारकडे फक्त ४ दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. जर निवडणूक आयोगाचा विचार केला तर शनिवारपर्यंत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला वाटपासाठीचे संमती दिलेली नव्हती. तसेच अजुनही अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करणे सुरूच आहे, असे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही मदत देण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत जिरायत आणि बागायत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १० हजार रुपये तर फळबागांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी कमीत कमी शेतक-यांसाठी दोन हेक्टर आणि फळपीक बागांसाठी दोन हेक्टर हे क्षेत्राच्या बाबतीतली कमाल मर्यादा आहे. त्यासाठी जवळ-जवळ ४५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
Share your comments