काळाच्या ओघात शेतीव्यवसायत मोठे बदल होत चालले आहेत जे की शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी कोणत्या न कोणत्या योजनांची अमंलबजावणी केली जाते. जे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा जो कालावधी होता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे जे की यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहेत पण सोबतच शेतकऱ्यांचे उत्पादन देखील वाढणार आहे. या योजनेमध्ये ठिबक आणि स्प्रिंकल या दोन्ही घटकांचा समावेश आहे. २०१५ मध्ये कृषी सिंचन योजना सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे.
२२ लाख शेतकरी घेणार योजनेचा लाभ :-
केंद्र सरकारने २०२१ च्या डिसेंम्बर महिन्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला २०२६ पर्यंत पाच वर्षे मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली होती. या योजनेचा विस्तार करताना सरकारने अशी माहिती दिली होती की याद्वारे जवळपास २२ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये अडीच लाख अनुसूचित जाती व दोन लाख अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकरी आहेत. या योजनेला संपूर्ण खर्च ९३ हजार ६८ कोटी एवढा आला.
बागायतीसह कोरडवाहू शेत जमिनीला पाणी मिळावे :-
या योजनेमधून बागायत क्षेत्रासोबतच कोरडवाहू शेतजमिनीला पाणी मिळावे हा उद्देश आहे. देशात १४ कोटी शेतजमिनीचे क्षेत्र आहे जे की २०१५ मध्ये कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली. २०१५ मध्ये केवळ ६ हजार ५०० कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली होती. यावरून असे समजते की लागवडीपैकी निम्यापेक्षा जास्त जमीन ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पावसाच्या पाण्यावर शेत म्हणजे उत्पादन तर कमीच राहणार आहे कारण निसर्गाचा थेट सर्वात प्रथम परिणाम हा उत्पादनावरच होतो. या योजनेमागचा उद्देश असा की सिंचन क्षेत्र वाढावे. सरकारने या योजनेत अनुदान देखील वाढवले आहे.
पाण्याची बचत अन् उत्पादनात वाढ :-
कृषी सिंचन योजनेत मंत्रालयाच्या दोन घटकांचा समावेश आहे त्यामध्ये पहिला घटक म्हणजे प्रति बंधारा जास्त उत्पादन आणि दुसरा घटक म्हणजे वॉटर शेड डेव्हलपमेंट आहे. शेतामध्ये पाण्याची उपलब्धता वाढवून खात्रीशिरपणे व लागवडियोग्य जमिनीचा विस्तार करणे हा खरा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमध्ये शेतीसाठी पाणी वापराची क्षमता सुधारवणे तसेच शाश्वत जलसंधारण पद्धती सुरू करणे यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर पाण्याची जास्तीत जास्त बचत करणे हा सर्वात महत्त्वाचा घटक या योजनेत आहे. २०२०-२०२१ या वर्षाच्या योजनांतर्गत ९ लाख ३८ हेक्टर क्षेत्रातील पिक सूक्ष्म सिंचनाखाली आली आहे. यामध्ये ठिबक आणि स्प्रिंकल सिंचनाचा समावेश आहे.
Share your comments