राज्यात असलेल्या हवेतील बाष्प कमी झाल्याने कोरडे वातावरण तयार होऊ लागले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे.उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत असतानाच अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि गोवा व कर्नाटकाची किनारपट्टीदरम्यान चक्रिय स्थिती आहे.
राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून थंडी कमी-अधिक होत आहे. येत्या आठ दिवसांत काही ठिकाणी थंडी किचिंत राहणार असली तरी मागील तीन ते चार दिवसांपासून हळूहळू कमी होण्यास सुरूवात झाली आहे. मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात थंडी वाढत असली तरी पहाटे किंचित थंडी असते.सध्या राज्यातील सर्वच भागात किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर, नांदेड वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे.
कोकणात थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तामपान १९ ते २१ अंश सेलिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडीत चढउतार असल्याने किमान तापमान ११ ते २१ अंश सेल्सिअस एवढे आहे.दरम्यान, मराठवाड्यात थंडी गायब होऊ लागली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे.
विदर्भात किंचित थंडी आहे. त्यामुळे किमान तापमानात घट आढळून येते.
Share your comments