सरकारी खात्यांच्या कुठल्याही परीक्षांच्या घोळ सध्या पाहायला मिळत आहे. सध्या सगळ्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या बाबतीत झालेला गोंधळ पाहिला.यामध्येविचार केला तर नियोजनाचा अभाव आणि संबंधित यंत्रणेतील ताळमेळ चा अभाव या सगळ्या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतात.
परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षा देखील स्थगित करण्यात आले आहेत आणि याला महत्त्वाचे कारण आहे ती एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप हे होय.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे परीक्षार्थी वेळेवर येऊ शकतील का नाही याबाबतप्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे कृषी सहाय्यकच्या परीक्षेला कुलसचिव यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता ही सत्तेचाळीस जागांसाठी 14 नोव्हेंबरला होणारी परीक्षा आता लांबणीवर गेली आहे. 14 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा पार पडणार होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे बसेस बंद आहेत. तसेच रेल्वेच्या ही मर्यादित फेऱ्या सुरू असल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला पोहोचू न शकण्याची शक्यता जास्त असल्यामुळे कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुरेंद्र काळबांडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.जवळजवळ सहा हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे अर्ज केले होते.परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळेबस बंद असल्याने विद्यापीठाला हा निर्णय घ्यावा लागला.
एसटी बंद च्या दरम्यान कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सर्वच भागातील एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार हे निश्चित होते. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या नियोजित परीक्षा पुढे घेण्यात याव्यात असे आवाहन केले होते.
अखेर कुलसचिव सुरेंद्र काळबांडे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यामुळे सध्या तरी ही परीक्षा 14 नोव्हेंबर रोजी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेची पुढील तारीख काय असेल याबाबत सांगण्यात आलेले नाही.मात्र, लवकरात लवकर या परीक्षेचा पुढील दिनांक हा कृषी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे.
Share your comments