छत्रपती संभाजीनगरमध्ये (दि.8) रोजी रोहित पवार पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. तेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे रोहित पवार यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची भेट घेवून संपूर्ण मराठवाड्यात दिवाळीपूर्वी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत याबाबत निवेदन दिले आहे. तसेच दुष्काळ जाहीर न केल्यास 10 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांची भेट घेतली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चारा या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर विभागीय आयुक्तांची भेट घेत मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची रोहित पवार यांनी मागणी केली.
रोहित पवार यांनी यासंर्दभात ट्वीट करत म्हटले आहे की, मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असूनही, केवळ 14 तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केलाय. शिवाय मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं जाहीर केलेलं हेक्टरी 13 हजार रुपयांचं अनुदानही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेलं नाही. राज्यात इतरत्रही अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं अनुदान व पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. या मागणीचं निवेदन मराठवाडा विभागाच्या विभागीय आयुक्तांकडं दिलं, असल्याचे रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
Share your comments