1. बातम्या

Drone spraying : शेतीमध्ये हवाई फवारणी ड्रोनचा होणार वापर; माऊली ग्रीन आर्मीचा पुढाकार

कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतीमध्ये हवाई फवारणी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यासाठी माऊली ग्रीन आर्मीने पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम हाती घेतला आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Drone spraying

Drone spraying

कृषी यांत्रिकीकरणाला (Agricultural mechanization) प्रोत्साहन देण्यासाठी शेतीमध्ये हवाई फवारणी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यासाठी माऊली ग्रीन आर्मीने (Mauli Green Army) पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम हाती घेतला आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) कृषी ड्रोन खरेदी, भाड्याने आणि प्रात्यक्षिकांना मदत करून कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यास चालना देण्यासाठी आर्थिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामधून शेतकरी सक्षम होण्यास मदत होणार आहे.

शेतकरी सक्षम आणि समृध्द करण्यासाठी माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती व अयोटेवल्ड एव्हिगेशन प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रीकल्चर स्प्रे ड्रोनचा वापर केला जाणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA), भारत सरकार व्दारे प्रमाणित करण्यात आले आहे.

स्प्रे ड्रोन मोडेलची माहिती

• क्षमता 10 लिटर टँक

• सोबत एक बॅटरी सेट

• हेग्जा कॉप्टर 6 पंखे

• स्प्रे यंत्रणा 4 नोझल अंतर्भुत

• बॅटरी बॅकप 20 मिनिटे (2.5 एकर औषध फवारणी)

स्प्रे ड्रोन चे विशेष तांत्रिक वैशिष्टे Special technical features of spray drones

• सर्व संचलन अत्याधुनिक रिमोट व्दारे

• सरी मधील अंतर पीकावरील उंची इत्यादी सर्व घटक पूर्व निर्धारित करता येते.

• सर्व नोझल पंख्याच्या खाली बसलेले असतात

• हवेच्या दाबामुळे पानाच्या दोन्ही बाजुला सम समान फवारणी होते. त्यामुळे उच्च दर्जाची परिणाम कारकता मिळते.

• उंच व सखल असलेल्या भागावर एक सामान फवारणी होती.

• सर्व दूर व खोलवर फवारणी होते.

• ड्रोन द्वारे हवेतून केलेल्या अंशातील फवारणी मुळे पिकाच्या सर्व भागावर औषध पोहचते.

• माहिती संचालित करता येते

• केलेल्या सर्व फवारणी विषयी सर्व माहिती जसे फवारणीचा वेळ, क्षेत्र औषधांचे प्रमाण इत्यादी रिमोट डिस्प्ले वर पाहता व संकलित करता येते.

• किटक नाशक औषध संपणाऱ्या ठिकाणाची नोंद होते.

मूख्य कार्यालय : आषाढी कार्तीकी माऊली ट्रस्ट. पत्ता - फ्लॅट नं. २ जगदंबा क्लासिक श्री. सुर्यनगरी एम.आय.डी.सी. बारामती.जि. पुणे. 413133 Mob : 9850300905 E-mail : maulitrust9999@gmail.com

English Summary: Drones will be used in agriculture Published on: 16 February 2022, 12:16 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters