1. बातम्या

कांदा उत्पादक शेतकरी सापडलेत "कही खुशी तर कही गम" मध्ये, जाणुन घ्या कांदाच्या दरातील लहरीपणा आणि त्याचा परिणाम

शेतकरी बांधवांनो जसं की आपणास ठाऊकच आहे राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी सुरु आहे. तसेच रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची लागवडीसाठी देखील शेतकरी बांधव लगबग करताना दिसत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णता हतबल झाला होता, आणि आता खरीप हंगामातील लाल कांदा विक्री करताना कांद्याच्या दरात कमालीचा लहरीपणा बघायला मिळत आहे. काही ठिकाणी लाल कांद्याला मनासारखा भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आनंदात असल्याचे प्रतीत होत आहे

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
farmer in trouble

farmer in trouble

शेतकरी बांधवांनो जसं की आपणास ठाऊकच आहे राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी सुरु आहे. तसेच रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची लागवडीसाठी देखील शेतकरी बांधव लगबग करताना दिसत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णता हतबल झाला होता, आणि आता खरीप हंगामातील लाल कांदा विक्री करताना कांद्याच्या दरात कमालीचा लहरीपणा बघायला मिळत आहे. काही ठिकाणी लाल कांद्याला मनासारखा भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आनंदात असल्याचे प्रतीत होत आहे

मात्र असे असले तरी राज्यात अनेक ठिकाणी लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा चिंतेत सापडला आहे. राज्यात अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून असते, आणि जर कांदा पिकाला असा लहरीपणाचा सामना करावा लागला तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून जाईल. नाशिक जिल्ह्यात तर बहुतांश शेतकरी केवळ कांदा पिकाची लागवड करताना दिसतात या शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन कांदा आहे. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनात देखील कमालीचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आणि आता रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव करत आहेत. त्यामुळे भविष्यात उन्हाळी कांद्याला काय दर मिळतो याबाबत देखील शेतकरी बांधव कमालीचा गोंधळलेला नजरेस पडत आहे.

नाशिक जिल्ह्यात तर रब्बी हंगामात उन्हाळा कांद्याची विक्रमी लागवड होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याला भविष्यात काय दर मिळतो याबाबत संभ्रमता शेतकरी बांधवांच्या मनात कायम आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. आज खरीप हंगामातील लाल कांद्याला कुठे चांगला बाजार भाव मिळाला तर काही ठिकाणी बाजार भाव हा चांगलाच खालावलेला नजरेस पडला. आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला जास्तीत जास्त 2145 प्रति क्विंटल एवढा बाजार भाव प्राप्त झाला. याच बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला तर सर्वसाधारण दर 1750 प्रति क्विंटल एवढा बाजारभाव होता.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार पेठ मध्ये लाल कांद्याला जास्तीत जास्त 2290 प्रति क्विंटल एवढा दर मिळाला तर कमीतकमी दर हा 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा होता तर सर्वसाधारण दर 2000 एवढा होता. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लासलगाव मार्केट वरून देशातील इतर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ठरत असतात. त्यामुळे लासलगाव मार्केट कांद्याचे दर ठरवण्यासाठी एक प्रमुख सूत्रधार मार्केट म्हणून ओळखले जाते.

English Summary: dramatically changes in onion rates is very dangerous for onion growers Published on: 10 January 2022, 09:59 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters