अलमट्टीतून 3 लाख 80 हजार, कोयनेतून 69,075 तर राधानगरीतून 7,356 क्युसेक विसर्ग

10 August 2019 10:51 AM


मुंबई, दि. 9:
अलमट्टी धरणातून 3 लाख 80 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3,100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7,356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. सकाळी 7 वाजता कोयना धरणामधून 69,075 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 52 फूट 11  इंच असून एकूण 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.29  टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

 • पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर.
 • भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे.
 • कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन,यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे.
 • तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचणवाडी व भाटणवाडी.
 • वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी.
 • कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे.
 • दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी.
 • कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज,सांगशी व काताळी.
 • वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन. फ, वाण्याचीवाडी.
 • हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर,गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ.
 • घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.
 • ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी.
 • शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. 
 • धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 107 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 84.44 टीएमसी तर कोयना धरणात 102.99 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

 • तुळशी 3.30  टीएमसी
 • वारणा 32.19 टीएमसी 
 • दूधगंगा 22.78 टीएमसी 
 • कासारी 2.50 टीएमसी
 • कडवी 2.52 टीएमसी 
 • कुंभी 2.48 टीएमसी
 • पाटगाव 3.72 टीएमसी
 • चिकोत्रा 1.41,चित्री 1.88 टीएमसी
 • जंगमहट्टी 1.22 टीएमसी
 • घटप्रभा  1.56 टीएमसी 
 • जांबरे 0.82 टीएमसी
 • कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे.

 • राजाराम 52.11 फूट
 • सुर्वे 50.1 फूट
 • रुई 80.6 फूट, 
 • इचलकरंजी 77.6 फूट
 • तेरवाड 82.3 फूट
 • शिरोळ 77.5 फूट
 • नृसिंहवाडी 77.5 फूट
 • राजापूर 62.4 फूट तर नजीकच्या सांगली 57.5 फूट आणि अंकली 62.4 फूट अशी आहे.
Koyna Radhanagari Almatti अलमट्टी कोयना राधानगरी
English Summary: Drainage of water 3 lakh 80 thousand from Almatti, 69,075 from koyna and 7,356 cusecs from Radhanagari dam

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.