कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरुपदी डॉ. संजय सावंत यांची नियुक्ती

Friday, 08 March 2019 07:40 AM


मुंबई: पुणे येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. संजय दिनानाथ सावंत यांची दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज डॉ. सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. सावंत यांची नियुक्ती पाच वर्षासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील, यापैकी जो दिनांक अगोदर असेल, तोपर्यंत करण्यात आली आहे. 

डॉ. तपस भट्टाचार्य यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथ यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ. संजय सावंत यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम. एससी (कृषी) ही पदवी प्राप्त केल्यानंतर पंतनगर येथील गोविंद बल्लभ पंत कृषी विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कलुगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. (डॉ) मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहापात्रा आणि कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

Dr. Sanjay Sawant Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू vice chancellor डॉ. संजय सावंत C. Vidyasagar Rao विद्यासागर राव दापोली

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.