आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन गौरवत असतो, पण ह्याच कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या समस्या काही कमी होण्याचं नाव काही घेत नाहीत. महाराष्ट्रात (Maharashtra) तर खूपच बिकट परिस्थिती आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची (Maharashtras Farmer) समस्या थांबायचे नाव काही घेत नाही. कधी टोमॅटो तर कधी शिमला मिरची अहो अक्षरशः शिमला मिरची तर शेतकऱ्यांनी फुकट लोकांना खायला घातली.
आता येथील एका शेतकऱ्याला 7-8 रुपये किलोने पपई विकावी लागत आहे. किमतीबाबत त्याला सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. हे आताचे प्रकरण महाराष्ट्रातील लातूर (Latur)जिल्ह्याचे आहे. बाजारात पपईला योग्य भाव न मिळाल्याने वलांडी गावात राहणारे संग्राम भोसले हे शेतकरी खूपच त्रस्त आहेत.
तीन वर्षांपूर्वी श्रीमान भोसले यांनी पपईची शेती सुरू केली होती. यावर्षी पपईला चांगलाच बहार आलाय. पण नशिबात काही वेगळंच लिहलं होत, पपईला बाजारात फक्त 7 ते 8 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे त्यांना पपई लागवडीसाठी लागलेला खर्च देखील भेटणार नाही असं चित्र त्यांना दिसत आहे. आणि त्यांना प्रश्न पडलाय की जर एवढी कमी कमी किंमत भेटत राहिली तर कस काय स्वतःला बळीराजा संभोधणारा शेतकरी आपला उदरनिर्वाह करेल.
श्रीमान भोसलेनी मांडली आपली व्यथा
श्रीमान संग्राम भोसले सांगतात की त्यांच्याकडे अडीच एकर बागायती शेत आहे. त्यांच्यामते, यंदा पपई लागवडीसाठी एकूण 3 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. भोसले सांगतात की, खुप मेहनत केल्यानंतर यंदा पपईला ईश्वराच्या कृपेनें खूपच चांगला बहार आलाय, पण देव एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने हिसकावतो अशीच गत झालीय चांगला बहार आला खरी पण पपईला किंमत काही मिळत नाही.
शेतकरी कष्ट करून, घाम गाळून सोन्यासारखे पिक पिकवतो, पण त्याच्या सोन्यासारख्या मालाला खरी किंमत देणे त्याच्या हातात नाही. ते म्हणतात ना, पिकत तिथे विकत नाही ही म्हण शब्दशा आणि अर्थाने ह्या प्रसंगी खूपच तंतोतंत बसते. भोसले सांगतात की, परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की पपई शेतातून बाजारात नेण्याचा खर्चही निघत नाही आहे. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणुन मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसानहोत आहे ते वेगळंच. बोलताना भोसले म्हणतात, सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत द्या.
किरकोळ विक्रीसाठी पपई चा भाव चक्क 40 रुपये किलो
भोसले यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी पपईची लागवड केली होती, तेव्हा पाऊस खूपच कमी पडला आणि परिस्थिती पार दुष्काळासारखी झाली. त्या वेळी, उन्हाळ्यात चक्क, पाणी विकत घेऊन झाडांना दिले जात होते.
आणि कशीबशी पपईची बाग जिवंत ठेवली होती. पपईचा दाम हा फक्त घाऊक बाजारात कमी झाला आहे मात्र किरकोळ बाजारात ते 40 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. घाऊक बाजारात कमी भाव असल्याने शेतकऱ्याला किरकोळ बाजारापेक्षा अनेक पटीने कमी पैसे मिळत आहेत. जर किरकोळ बाजारात चांगला दर मिळू शकतो, तर मग शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळाला पाहिजे. अशी सार्थ हाक भोसलेनी सरकारपाशी केली.
Share your comments