कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. यासह साखर, सोयाबीन यासारख्या उत्पादनासाठी सुद्धा प्रोत्साहन धोरण आवलंबले असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे.
कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. यासह साखर,सोयाबीन यासारख्या उत्पादनासाठी सुद्धा प्रोत्साहन धोरण आवलंबले असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे.
केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी वित्तसहाय्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून अनुदान वाढीसाठी आग्रह धरला होता. केंद्राने निर्यात अनुदानात केलेल्या वाढीमुळे निर्यातदार देशांच्या तुलनेत भारतीय कांदा स्पर्धा करण्यास मदत होणार आहे. याशिवाय नवीन वर्षामध्ये देशांतर्गतचा कांदा निर्यात झाल्याने स्थानिक मागणीच्या तुलनेत पुरवठा स्थिरावल्याने भाव सुधारण्यास मदत होणार आहे. केंद्राच्या या धोरणामुळे नवीन कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा तयार झाली आहे.
English Summary: doubled Subsidies for Onion ExportPublished on: 30 December 2018, 09:09 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments