अहमदनगर
पावसाअभावी राज्यातील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्याबाबत सरकार विचार करत आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण अद्यापही जिल्ह्यांमध्ये पावसाची शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत सरकार विचाराधीन आहे, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.
यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच अहमदनगर आणि पुण्याच्या बहुतांश भागात देखील पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
पेरणी केलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अपुऱ्या पावसाच्या स्थितीमुळं सरकार देखील याबाबत गंभीर असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Share your comments