1. बातम्या

Shivsena Update : 'तुम्ही काळजी करु नका, एक-एक करुन सगळी येणार'

"कोणीतरी सांगितले आहे एक-एक करुन काय घेता.सगळेच घ्या, तुम्ही काळजी करु नका एक-एक करुन सगळेच याठिकाणी येणार आहेत. आपल्याला सोडून लोक का जात आहेत याच आत्मपरिक्षण आधी ठाकरेंनी करावं"

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Maharashtra Politics Update

Maharashtra Politics Update

मुंबई 

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद काही संपवायचे नाव घेत नाही. त्यात उद्धव ठाकरे यांनी पु्न्हा शिंदे गटाला लक्ष केले आहे. तसंच भाजपाने आणि शिंदे गटाने एक-एक करुन सगळे माणसे फोडवीत. बिनकामाची सगळी माणसे तुम्ही घ्यावीत, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. त्यावर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार शिंदे म्हणाले की, "कोणीतरी सांगितले आहे एक-एक करुन काय घेता.सगळेच घ्या, तुम्ही काळजी करु नका एक-एक करुन सगळेच याठिकाणी येणार आहेत. आपल्याला सोडून लोक का जात आहेत याच आत्मपरिक्षण आधी ठाकरेंनी करावं", असा सल्लाही खासदार शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान, आनंद दिघे निष्ठावंत होते, त्यांचे गद्दारांसोबत नाव जोडू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. असा प्रश्न खासदार शिंदे यांना विचारला असता त्यावर शिंदे संतापले. ते म्हणाले की, संजय राऊत काय म्हणाले त्याबाबत मला प्रश्न विचारत जाऊ नका. त्याच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला आम्हाला तेवढा वेळ नाही.आम्हाला चांगली कामे करायची आहेत, असं शिंदे म्हणाले.

English Summary: Don't worry, they will all come one by one Published on: 31 July 2023, 11:42 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters