मुंबई
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद काही संपवायचे नाव घेत नाही. त्यात उद्धव ठाकरे यांनी पु्न्हा शिंदे गटाला लक्ष केले आहे. तसंच भाजपाने आणि शिंदे गटाने एक-एक करुन सगळे माणसे फोडवीत. बिनकामाची सगळी माणसे तुम्ही घ्यावीत, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. त्यावर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार शिंदे म्हणाले की, "कोणीतरी सांगितले आहे एक-एक करुन काय घेता.सगळेच घ्या, तुम्ही काळजी करु नका एक-एक करुन सगळेच याठिकाणी येणार आहेत. आपल्याला सोडून लोक का जात आहेत याच आत्मपरिक्षण आधी ठाकरेंनी करावं", असा सल्लाही खासदार शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, आनंद दिघे निष्ठावंत होते, त्यांचे गद्दारांसोबत नाव जोडू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. असा प्रश्न खासदार शिंदे यांना विचारला असता त्यावर शिंदे संतापले. ते म्हणाले की, संजय राऊत काय म्हणाले त्याबाबत मला प्रश्न विचारत जाऊ नका. त्याच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला आम्हाला तेवढा वेळ नाही.आम्हाला चांगली कामे करायची आहेत, असं शिंदे म्हणाले.
Share your comments