1. बातम्या

आता वाट पाहू नका देऊन टाका! कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आले चांगले दिवस..

बाजारात कापसाठी आवक मंदावली आहे, मात्र कापसावर दबाव वाढत आहे, म्हणजेच कापसाची मागणी आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कृउबात कापसाची सर्वात जास्त आवक झाली. १ हजार १३० क्विंटल कापसाची आवक झाली. वर्ध्यात कापसाला आज सर्वाधिक जास्त भाव मिळाला, ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असा कापसाला भाव मिळाला.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Good days have come to cotton farmers

Good days have come to cotton farmers

बाजारात कापसाठी आवक मंदावली आहे, मात्र कापसावर दबाव वाढत आहे, म्हणजेच कापसाची मागणी आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कृउबात कापसाची सर्वात जास्त आवक झाली. १ हजार १३० क्विंटल कापसाची आवक झाली. वर्ध्यात कापसाला आज सर्वाधिक जास्त भाव मिळाला, ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असा कापसाला भाव मिळाला.

यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. सरासरी भाव, ७ हजार ३०० रुपये असा आहे. मात्र किनवट, भद्रावती, पारशिवनी, उमरेड, वरोरा-माढेली, काटोल येथे कापसाला सरासरी भाव हा ८ हजार रुपये क्विंटलच्या आसपास होता. ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.

सध्या कापूस घरात ठेवून दिवसेंदिवस उष्णता वाढली तर कापसाचे वजन कमी होते, घरात ओल लागली, किंवा अवकाळी पावसामुळेही कापूस खराब होण्याची भीती असते. म्हणून कापूस विकून हातात पैसे आल्यावर इतर शेतीच्या कामाकडे मोर्चा वळवणे शेतकऱ्याला कधीही परवडतं.

Drone: ड्रोन 1 दिवसांत 30 एकर शेतीवर फवारणार औषध, सरकारकडून अनुदान

आता कापूस भाववाढीची ही बातमी शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे, आता जास्त भाववाढीची अपेक्षा न ठेवता, देऊन टाकतो अशीच भूमिका शेतकऱ्याला पडवणार आहे. कापूस तसा सांभाळायलाही कठीण आग लागली तर रोखणं कठीण, राखंच हातात येते, त्यामुळे आणखी काळजी घ्यावी लागते.

कोल्ड स्टोरेज व्यवसायाच्या माध्यमातून साधा आर्थिक प्रगती, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

दरम्यान, कापूस उत्पादक शेतकरी मागील ३ महिन्यांपासून चिंतेत होते, त्यांच्याकडे सरकारने कोणतंही लक्ष दिलेलं नाही. पण बाजारातील चढऊतार त्यांच्यासाठी आज आशेचा दीप घेऊन आली आहे. यामुळे सध्या तरी चांगले दिवस आले आहेत.

ब्रेकिंग! अजित पवार, सुनेत्रा पवार यांना ईडीकडून क्लीनचिट? राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग...
एका तासात झालं होत्याच नव्हतं! एका तासात 25 लाखांचं नुकसान, शेतकऱ्यानं सांगितला थरार
2 एकरात 3 महिन्यात 6 लाखांच उत्पादन, सेंद्रीय शेतीची कमाल...

English Summary: Don't wait now, give it a try! Good days have come to cotton farmers.. Published on: 12 April 2023, 10:55 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters