कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन चालू आहे. परंतु या लॉकडाऊनमुळे आवश्यक वस्तूंची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा फटका शेती उद्योगाला बसत आहे. बाजार शेतमाला नेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशात आता खरीप हंगाम येऊ ठेपला आहे, काही दिवसातच खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतच्या मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे.
या हंगामात शेतकऱ्यांना अडचण होऊ नये, वाणाचे बियाणांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांची उपलब्धता होईल, असे नियोजन करावे अशा सुचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्राशासकीय अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांसोबत थोरात यांनी संगमनेरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. पीक विमा भरपाईत पीक कापणी प्रयोगाला महत्त आहे. शेतकऱी उत्पादक गटांमार्फत लॉकडाऊनमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, यासारख्या शहरात भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या मुल्यसाखळीचे सबलीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी गटास अनुदानित पॅक हाऊस उभारणी, शीत वाहन उपलब्ध करु देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांवर स्थलांतराची वेळ येऊ देऊ नये, यासाठी गावातच काम उपलब्ध होईल, या दृष्टीने मनरेगा अंतर्गत शेततळी व कंपार्टमेंट बंडिगच्या कामाचे नियोजने करावे असेही त्यांनी सांगितले.
Share your comments