1. बातम्या

"कृषीमंत्र्यांना ओला आणि सुका दुष्काळ यातील फरक तरी कळतो का!''

Return rain: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सरकारकडून मदत मिळत नाही. ज्या भागात मागील वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने झाली, त्या भागात दीड दीड महिने कमरेइतके पाणी शेतात साचले आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Ambadas Danve Abdul Sattar

Ambadas Danve Abdul Sattar

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सरकारकडून मदत मिळत नाही. ज्या भागात मागील वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने झाली, त्या भागात दीड दीड महिने कमरेइतके पाणी शेतात साचले आहे.

पाण्याचा निचरा होत नाही, पिके सडून गेली ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असताना कृषिमंत्र्यांना ओला व सुका दुष्काळ यातील फरक समजतो की, नाही असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

कान्हूर मेसाई (ता.शिरूर ) येथे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन परतीच्या झालेल्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

कृषी मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कान्हूर मेसाई ( ता.शिरूर ) हा भाग कायम दुष्काळी. नेहमी पाण्यासाठी टाहो फोडणारा हा भाग. पाण्यासाठी अनेक आंदोलने या पूर्वी या भागात झाली. मात्र परतीच्या पावसाने या भागात मोठे नुकसान केले आहे. बाजरीची पिके सडली आहे.

सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुप्पट बोनस

स्वतः शेतात जाऊन पाहणी केलेली आहे. सुमारे ८० टक्के पिकांचे नुकसान झाले असून दीड महिन्यापासून कमरेइतके पाणी शेतात साचून राहिले आहे. कृषीमंत्र्यांना शेतीच्या प्रश्नांची जाण आहे की नाही माहीत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

दिवाळी वर पावसाचे सावट; नेमका काय आहे हवामान खात्याचा अंदाज? जाणून घ्या..

English Summary: "Does the agriculture minister even know the difference between wet and dry drought!" Published on: 22 October 2022, 05:49 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters