पीएम उज्वला योजना अंतर्गत 32 रुपये भरल्यानंतर खरच एक लाखांचं कर्ज मिळणार का?

20 December 2020 09:52 AM By: KJ Maharashtra

व्हाट्सअप किंवा फेसबुकवर सध्या सरकारच्या अमुक एका योजनेमुळे एक लाखाचं कर्ज मिळेल अशी माहिती सांगणारा एखादा मेसेज किंवा तुम्ही लेख वाचलाय का? 3200 रुपये भरल्यानंतर एक लाखाचं कर्ज मिळेल अशा प्रकारचा काही मेसेजेस सोशल मीडियावर फिरताहेत. त्याबाबतची सत्य वस्तुस्थिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

तसे पाहिले तर सोशल मीडियाचा विचार केला तर सरकारी  योजनांबाबत परिषद चुकीची माहिती पसरवली जाते. चुकीच्या माहितीला बळी पडून अनेक लोकांना बसवण्याच्या घटना समोर येतात. सोशल मीडियाचा विचार केला तर त्याचा एका बाजूने फार चांगला फायदा होतो. परंतु काही चुकीचे लोक या सोशल मीडियाचा चुकीचा वापर करतात.. त्यामुळे अशा लोकांपासून आपण स्वतःला सावध करणं फार गरजेचं असतं.

प्रधानमंत्री उज्वला योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून गरीब जनतेला मोफत गॅस सिलेंडर वाटप केले जातात.  या योजनेच्या संदर्भात सोशल मीडियावरील चुकीचा मेसेज व्हायरल केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या नावाने एका परवड लेटर वायरल होताना दिसत आहे. या लेटर मध्ये दावा करण्यात आला आहे की, प्रधानमंत्री फायनान्स योजनेद्वारे सरकार एक लाखाचं कर्ज मिळेल आणि या कर्जाचा व्याजदर 8% इतका असेल व ही रक्कम येत्या 2 वर्षात फेडायची असेल.

दर महिन्याला 4523 रुपयांचा एमाय असेल. जल लेटर मधील ही माहिती वाचली तर ही योजना खरी असेल असे वाटते. पण या पुढची माहिती संशयास्पद आहे. संबंधित योजनेद्वारे कर्ज मिळवण्यासाठी 3200 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, हे पैसे भरल्यानंतर सरकारी टीम लाभार्थ्यांच्या घरी जाऊन एक लाख रुपये देईल असे देखील लिटर मध्ये म्हटले आहे. ही माहिती संशयास्पद असल्याचे अनेकांच्या लक्षात आलं. सरकारी योजनांचे नाव सांगून काही लोकांची फसवणूक होऊ शकते यात लक्षात घेऊन केंद्र सरकारने वायरल होणारे मेसेज व स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्र सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो च्या फॅक्ट चेक च्या टीमने  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रोवल लेटर वर खुलासा केला आहे. हे लेटर खोटे असून भारत सरकार कडून अशी कोणत्याही प्रकारची योजना लागू करण्यात आलेली नाही., असं पीआयबी  ने ट्विटरवर स्पष्ट केला आहे. याच्यापुढे मेसेज बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

ujjawala yojana loan money
English Summary: Does PM Ujwala really get a loan after paying Rs 32 under the scheme?

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.