1. बातम्या

पिस्ता इतका महाग का आहे माहितेय? पिस्ता निर्मितीचा प्रवास ऐकून धक्काच बसेल..

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक पदार्थ खात असतो. मात्र आपण बाजारातून सगळ्या गोष्टी किलोमध्ये खरेदी करत असतो. असे असताना मात्र पिस्ता शक्यतो किलोमध्ये घेत नाही. याचे कारण म्हणजे त्याचे असलेले दर हे आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक पदार्थ खात असतो. मात्र आपण बाजारातून सगळ्या गोष्टी किलोमध्ये खरेदी करत असतो. असे असताना मात्र पिस्ता शक्यतो किलोमध्ये घेत नाही. याचे कारण म्हणजे त्याचे असलेले दर हे आहे. पिस्त्याचे दर हे खूपच महाग असतात. यामुळे ते घेणे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. असे असताना मात्र आपण कधी पिस्ता महाग का असतो याचा कधी विचारही करत नाही. यामुळे आपण आज जाणून घेणार आहोत की पिस्ता नेमका कोणत्या कारणामुळे महाग असतो.

बेदाणे, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, सुकं अंजीर आदी पदार्थ सुका मेवा म्हणून परिचित आहेत. मात्र पिस्ता हा यामध्ये खूपच महाग असतो. असे असले तरी हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. आपल्याला आवडणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये आइस्क्रीम, श्रीखंड, मिठाई या पदार्थांचा समावेश होतो. हे तयार करण्यासाठी सुका मेवा वापरला जातो. पिस्त्याची शेती करणे मोठ्या कष्टाचे असते. त्यातच पिस्त्याच्या झाडाला फळधारणा होण्यासाठी 15 ते 20 वर्षं लागतात. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे अशक्य असते. यामुळे याचे दर नेहेमी महाग असतात. यामुळे ते खाणे अनेकांना परवडत नाही. लागवडीनंतर 15 ते 20 वर्षांनी पिस्त्याच्या झाडाला फळधारणा होते. तोपर्यंत त्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो.

तसेच एका झाडापासून शेतकऱ्याला खूप कमी प्रमाणात पिस्ते मिळतात. यामुळे याचे दर वाढतच असतात. तसेच १५ वर्ष देखभाल करून देखील पिस्त्याचे अपेक्षित उत्पादन हाती येईल याची खात्री नसते. यामुळे अनेक शेतकरी याकडे वळतच नाहीत. तसेच काही मोजकेच देश याची शेती करतात. पिस्त्याची शेती कॅलिफोर्निया, ब्राझीलसह काही थोड्याच देशात केली जाते. तसेच यामध्ये २० वर्ष वाट बघून देखील पैसे मिळतीलच याची खात्री नसते.

तसेच याची शेती करण्यासाठी जास्त पाणी, मोठी जमीन, मजूर आणि पैशांची गरज असते. आणि या गोष्टी सगळ्याच शेतकऱ्यांना शक्य होत नाहीत. तसेच दरवर्षी याचे उत्पन्न मिळत नाही. यामुळे दोन वेळेस याची लागवड करावी लागते. पिस्त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी पिस्ता फायदेशीर असतो. यामुळे याचे दर नेहेमीच तेजीत असतात. याच्या उत्पनात नेहेमीच घट होत असते.

English Summary: Do you know why pistachios are so expensive? You will be shocked to hear the journey of pistachio production. Published on: 12 January 2022, 06:25 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters