सातबाराचा अर्थ माहिती आहे का दादा ?

27 July 2020 06:52 PM

बँकेत कर्ज प्रकरण करण्यावेळी किंवा इतर जमिनीचे व्यवहार करताना सातबारा हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. सात बारा हा जमिनीची निगडित शब्द आहे. पण याचा काय अर्थ असतो. सातबारा म्हणजे जमीन का शेत काय असतो याचा अर्थ. आज आपण या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत. तलाठ्याकडे जमिनी संदर्भातील रेकॉर्ड असते त्यात कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय. जमिनीची माहिती यामध्ये दिलेली असते त्याला गाव नमुना असे म्हणतात.

गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 अशी विभागणी असते. त्यातील 7 नंबरचा नमुना हा मालकी हक्काबाबत असतो तर 12 नंबर मध्ये पिकांबाबत माहिती दिलेली असते. या दोन्ही प्रकारच्या माहितीचे एकत्रीकरण हे सातबारामध्ये केलेले असते. जमिनीचे सातबारा आणि त्याचे योग्य नियोजन आणि नोंद ठेवण्याचे काम तलाठीकडे असते.

 

7 -12 च्या संबंधित महत्त्वाच्या बाबी

 • सातबारा उतारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतरिम पुरावा असतो.
 • सातबारा उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर आहे असे ठरवले जाते तोपर्यंत तो कायदेशीर मानला जातो.
 • सातबारामध्ये पीक पाहणी नोंद केलेली असते ते दरवर्षी केली जाते.
 •  जमिनीचे गटनंबर असतात त्या प्रत्येक गटासाठी एकच सातबारा असतो.
 •  मालकाशिवाय दुसऱ्या व्यक्तीचे नाव, कुळ, खंड इत्यादींची नावे सातबारा उतारामधील लावण्याचा अधिकार तलाठी यांना नाही.
 • सातबारा उतारा असलेल्या नोंदींचे पुस्तके दर दहा वर्षांनी लिहिली जातात.

   गाव नमुना 12 हा पिकांसंबंधी आहे. गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंद घेणे अभिप्रेत असते. गाव नमुना नंबर असलेल्या रकान्यात पिकांच्या नोंदी लिहाव्यात व त्या खालील क्षेत्र  लिहावे.

पिकपाहणी संदर्भातील महत्त्वाच्या बाबी

 •  पिक पाहणीच्या रकान्यात वहिवाट दाराचे नाव आहे की नाही हे तपासावे.
 • पिक कोणते आहे व किती क्षेत्रात आहे याची नोंद केली की नाही हे कटाक्षाने पाहावे.
 • विहीर व इतर सिंचनाच्या साधनांची नोंद पहावी.
 • गाव नमुना 12 मध्ये पडीक जमिनी, त्यांचे प्रकार यांच्या नोंदी असतात.
 • आपल्यापैकी बऱ्याच जणांना 7 -12 या अंकांचा व्यवस्थित अर्थ माहीत नसतो. वरती दर्शविल्याप्रमाणे या दोन अंकांचा अर्थ असतो.

agriculture land 7/12 farm land सातबारा शेती जमीन
English Summary: Do you know the sath bara words meaning , read this to know

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.