शेतीमध्ये आपण बऱ्याच प्रमाणात विविध संकल्पनांचा आणि शब्दांचा वापर करत असतो. त्यांचा विचार केला तर आपण त्यांचे साधारणता रासायनिक खते, जैविक खते, विद्राव्य खते इत्यादी प्रकारात वर्गीकरण करत असतो. परंतु खतांच्या बाबतीत बऱ्याचदा चिलेटेड हा शब्द ऐकायला येतो. नेमका चिलेटेड या शब्दाचा अर्थ काय? या बाबतीत संपूर्ण माहिती या लेखात आपण करणार आहोत.
नेमकी चिलेटेड म्हणजे काय?
जर रासायनिक दृष्ट्या चिलेटेड या शब्दाचा अर्थ पाहिला तर तो म्हणजे धनभारित अन्नद्रव्य उदाहरणच द्यायचे झाले तर आयर्न, मॅग्नीज, जस्त, कॉपर यांच्यासोबत सेंद्रिय पदार्थांचे रासायनिक बंध तयार होऊन तयार झालेले नवीन संयुग याला चिलेटेड असे म्हणतात. चिलेटेड मध्ये धनभारित सूक्ष्म अन्नद्रव्य अनु धरुन ठेवला जातो आणि पिकांना गरजेनुसार उपलब्ध केला जातो.
ची लेट्सचे प्रकार
- पहिला प्रकार हा कृत्रिमरीत्या तयार केलेले ची लेट्स
- नैसर्गिकरित्या तयार झालेले चेलेट्स
कृत्रिमरीत्या तयार केलेले चिलेट्स
रासायनिक अभिक्रिया च्या माध्यमातून तयार केलेल्या ची लेट्स हे बाजारात उपलब्ध आहेत. त्याची काही उदाहरणे पाहू.
-
ई डी टी ए- इथिलीन डाय अमाईन टे ट्रा ऍसिटिक ऍसिड
-
एच ए डी डी ए – हायड्रोक्सि इथाईल इथिलिन डाय अमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड
-
ई डी डी एच ए - इथिलीन डाय अमाईन डाय हैद्रोक्सि ऍसिटिक ऍसिड
-
सी डी टी ए – सायक्लो हेन झेन डाय अमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड
इत्यादी कृत्रिमरीत्या तयार केलेले चिलेटेड आहेत.
नैसर्गिकरीत्या तयार झालेले लेट्स
सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाच्या माध्यमातून जी सेंद्रिय आम्ले तयार होतात ती प्रमुख्याने मॅलिक ऍसिड, टायटारिक ऍसिड, सायट्रिक ॲसिड ही थोड्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटींगचे कार्य करतात. त्यामुळे पुरवठा करण्यात आलेली सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरूपात टिकून राहतात. तसेच नैसर्गिक रीत्या तयार झालेले सेंद्रिय पदार्थ देखील ची लेट स्वरूपात उपलब्ध होतात. पदार्थांच्या विघटनातून काही सेंद्रिय पदार्थ तयार होतात जसे की हुमिक एसिड, फलविक ऍसिड तसेच विविध प्रकारचे सेंद्रिय आमले व काही अमिनो ऍसिड तयार होतात.
हेच सेंद्रिय पदार्थ ची लेट्स म्हणून कार्य करतात व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या अनु धरून ठेवतात. व ते पिकांना सहजपणे उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत व निंबोळी पेंड इत्यादी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून सल्फेट युक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. शेतकरीसुद्धा स्वतः नैसर्गिक रित्या त्यांच्या शेतामध्ये काही चिलेटेड तयार करू शकता व त्यांचा वापर जमिनी द्वारा सहजरीत्या करता येतो. अर्धवट कुजलेले सेंद्रीयखत किंवा शेणखताच्या वापरामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम होत असतो त्यामुळे पूर्णता कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा किंवा शेणखताचा वापर जमिनीत खत म्हणून करावा..
Share your comments