शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन दरबारी अनेक नाविन्यपूर्ण योजना विचाराधीन असतात तसेच अनेक योजना अमलातही आणल्या गेलेल्या असतात. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मायबाप सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना राबवित असते. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे शेतकर्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणे हेच असते. पीएम किसान सम्मान निधि योजना ही देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे, या योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात, हे सहा हजार रुपये पात्र शेतकर्यांना दोन हजाराच्या तिने हफ्त्यात दिले जातात.
या योजनेचा लाभ अशाच शेतकऱ्यांना दिला जातो ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या पोर्टल वर स्वतःला रजिस्टर केले आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाची कागदपत्रे देखील सादर करावी लागतात, केंद्र सरकारने नुकतेच पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये मोठा बदल केला आहे. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनादेखील आता या योजनेचा पुढील हप्ता प्राप्त करण्यासाठी काही महत्त्वाची माहिती पोर्टलवर सादर करावी लागणार आहे. ही माहिती सादर केली नाही तर या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पी एम किसान पोर्टल वर कोणती माहिती अपडेट करण्याची सक्ती शासनाद्वारे करण्यात आली आहे.
•पीएम किसान सन्मान निधी योजना या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना स्वतः रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
•आपल्या आधार कार्ड मध्ये नमूद केलेल्या नावाप्रमाणेच पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या फॉर्म मध्ये देखील नाव असणे अनिवार्य आहे तसेच आधार कार्ड वर असलेली जन्मतिथी, आपले लिंग याचा उल्लेख करणे अनिवार्य आहे.
•यासोबतच आपणास आपली कॅटेगिरी अर्थात आपण SC, ST, OBC कुठल्या कॅटेगरी मधून येतात हे देखील नमूद करावे लागणार आहे.
•शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी योग्य बँक खात्याची माहिती अपलोड करणे खूप महत्वाचे आहे. योग्य बँक खाते क्रमांक तसेच IFSC कोड अपलोड केला तरच या योजनेचा पैसा आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर होऊ शकतो अन्यथा आपणास या योजनेअंतर्गत मिळणारा पैसा प्राप्त होणार नाही.
चुकीच्या बँक तपशीलामुळे शेतकऱ्यांचे पैसे खात्यात वर्ग होत नाहीत.
•तुमचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्डची माहिती देखील अद्ययावत करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एवढी माहिती व्यवस्थित रित्या अद्ययावत केली तरच खात्यात पैसे येणार आहेत.
Share your comments