कृषी विद्यापीठे म्हटले म्हणजे शेती क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन आणि वानांची निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून नवनवीन तंत्रज्ञान शेती क्षेत्रामध्ये आणण्याच्या कामात कृषी विद्यापीठांचे स्थान अमुलाग्र आहे
सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील घाटमाथा परिसरात वरील हवेवरच्या गव्हा बाबत राहुरी कृषी विद्यापीठाच्या महाबळेश्वर येथील कृषी संशोधकांनी पाहणी केली. यावेळी या हवेवरच्या गहू पिकाचे अधिकचे संशोधन करून यामध्ये सुधारित वाण विकसित करण्याचा योजना असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या महाबळेश्वर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सुशील गेरवा यांनी दिली. हवे वरचा गहू अर्थात पाणी न वापरता उत्पादित केलेल्या गहू हेसांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावरील गव्हाचेवैशिष्ट्य आहे. या गव्हाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या गव्हाला या गव्हाला पान गहू आणि शेत गहू असे स्थानिक नावे आहेत.
याच नावाने या हवेवरच्या गहू पिकाच्या प्रजाती या लोकांनी आजवर प्राणपणाने जपल्या आहेत. या हवेवरच्या गव्हाच्या प्रजातींचे पाहणी करण्यासाठी महाबळेश्वर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ..सुशील गेरवा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पाहणी केली. यावेळी या पथकाने गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्ही पानगहू आणि शेत गहू हे बिन पाण्याचा किंवा बिगर पाण्यावर केवळ हवेवर येणारे गहू दरवर्षी पिकवतात. आम्ही पिढ्यान पिढ्या व पूर्वापार हे पीक घेत आलो आहेत. या गहू चे वैशिष्ट्य म्हणजे हे दुष्काळी आणि अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये देखील घेतात. साधारणपणे परतीच्या पावसाची वेळ संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात या गव्हाची पेरणी करतो.
पुढच्या साडेतीन ते चार महिन्यात पीक चांगले तयार होते. थंडीच्या दिवसातील वातावरण या पिकाला पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या भेटीदरम्यान डॉक्टर गेरवा यांनी सांगितले की, या गव्हाच्या दोन्ही प्रजातींवर जास्त संशोधन करून सुधारित वाण विकसित करण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.(स्रोत-पुढारी)
Share your comments